jagdeep dhankhar nirmala sitharaman mallikarjun kharge (1).jpg sarkarnama
देश

Video Mallikarjun Kharge : आधी सरकारवर तुटून पडले, नंतर 'माताजी' म्हणत खर्गेंनी उडवली सीतारामण यांची खिल्ली; धनखड हसत म्हणाले...

Akshay Sabale

यंदाच्या अर्थसंकल्पात मोदी सरकारनं सत्तेतील त्यांच्या सहकारी पक्षांची मर्जी राखण्यासाठी बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी खजिना खुला केला. राजधानी विकाससाठी आंध्राला 15 हजार कोटी, तर बिहारसाठी 58 हजार 900 कोटींची तरदूत करण्यात आली आहे.

यानंतर 'इंडिया' आघाडीतील घटकपक्ष आक्रमक झाले आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे ( Mallikarjun Kharge ) यांनी अन्य राज्यांना निधीत डावलल्यानं राज्यसभेत मोदी सरकारवर हल्लाबोल करत निषेध व्यक्त केला. तसेच, अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना 'माताजी' म्हणत खर्गेंनी खिल्ली उडवली. यावेळी खर्गेंना उद्देशून राज्यसभा सभापती जगदीप धनखड म्हणाले, "सीतारामण या तुमच्या मुलीच्या वयाच्या आहेत."

नेमकं काय घडलं?

निधीवाटपावरून मोदी सरकारला घेरताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, "अर्थसंकल्पात कुठल्याही राज्याला निधी मिळाला नाही. सगळ्यांच्या थाळ्या रिकाम्या राहिल्या आहेत. फक्त दोघांच्या थाळीत भजे आणि जलेबी देण्यात आली. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब, हरयाणा, राजस्थान, छत्तीसगड, दिल्ली, ओडिसाला काहीही मिळालं नाही. असा अर्थसंकल्प मी कधीही पाहिलं नाही."

"कुणाला तरी खूश करण्यासाठी आणि खुर्ची वाचविण्यासाठी हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला," अशी टीका करत खर्गेंनी निषेध व्यक्त केला. यावेळी "माताजी बोलण्यात एक्सपर्ट आहेत," असं म्हणत खर्गेंनी अर्थमंत्री सीतारामण यांची अप्रत्यक्षपणे खिल्ली उडावली. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

यावर राज्यसभा सभापती स्मितहास्य करत जगदीप धनखड म्हणाले, "त्या ( निर्मला सीतारामण ) तुमच्या मुलीच्या वयाच्या आहेत."

यानंतर खर्गेंनी म्हटलं, "ज्या-ज्या विरोधकांच्या अधिक जागा जिंकून आल्या, तिथे-तिथे निधीबाबत डावलण्यात आलं. सर्व राज्यांना समान निधी मिळाला नाही. मग, विकास कसा होणार?"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT