Mallikarjun Kharge sarkarnama
देश

Mallikarjun Kharge on EVM : 'बॅलेट पेपेर'साठी काँग्रेसने आता घेतला 'हा' निर्णय; मल्लिकार्जुन खर्गेंनी केली घोषणा, म्हणाले..

Congress on Ballot Paper दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर पक्षाच्या संविधान दिवस समारंभात खर्गे बोलत होते. नाना पटोले यांनीही मांडले आहे मत.

Mayur Ratnaparkhe

Mallikarjun Kharge Vs BJP News : महाराष्ट्र आणि झारखंड निवडणुकीनंतर काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. पक्षाला केवळ 16 जागा मिळवण्यात यश आलं आहे. निवडणूक निकालानंतर काँग्रेसने परावभवाची कारणमिमांसा केली आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचं एक मोठं विधान समोर आलं आहे. खर्गे यांनी म्हटलं आहे की, निवडणुकी बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत आणि हाच मुद्दा घेऊन ते भारत जोडो यात्रेप्रमाणे देशभरात जाणार आहेत.

दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर पक्षाच्या संविधान दिवस समारंभात बोलताना मल्लिकार्जुन खर्गे(Mallikarjun Kharge) म्हणाले, ''आम्हाला ईव्हीएम नकोय, आम्हाला बॅलेट पेपर हवे आहेत.'' याशिवाय खर्गेंनी दावा करत हे देखील म्हटले की, ''महाराष्ट्राच्या निवडणुकीत अदाणीचा मोठा हात होता. त्याला मोदींनी एवढी संपत्ती दिली आहे की ती आता तो पचवूही शकत नाही.''

याचबरोबर पंतप्रधान मोदींवर(PM Modi) निशाणा साधत खर्गे म्हणाले की, काहीजण संविधानाची स्तुती करत आहेत. त्याचे दर्शन घेतात आणि त्यामध्ये भाव-भक्ती दाखवतात, मात्र आतल्या आतच ते संविधान संपुष्टात आणू इच्छित आहेत. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा देखील लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी काढली होती. या यात्रेत देशातील जनेता त्यांच्याशी जुडली आणि समाजातील प्रत्येक वर्गाशी जुडलेले लोक त्यांच्यासोबत आले होते.

निवडणुकीबाबत काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर यांनी आरोप केला की, राज्यात निवडक जागांवर ईव्हीएम हॅकींग केली गेली आहे. गृहमंत्री परमेश्वर यांचे म्हणणे आहे की, वरिष्ठ पक्षनेत्यांनी निकालांचे सखोल विश्लेषण केले, ज्यानंतर त्यांना असं वाटतं आहे की अनेक जागांवर ईव्हीएममध्ये हेराफेरी केली गेली.

जेव्हा गृहमंत्री परमेश्वर यांना विचारलं गेलं की, झारखंड निवडणुकीत ईव्हीएमशी निगडीत काही मुद्दा का समोर आला नाही. त्यावर उत्तर देताना त्यांनी म्हटले की, हेराफारी अशाप्रकारे केली जाते की त्यावर कोणी प्रश्न उपस्थित करू शकणार नाही.

याशिवाय ननाना पटोले(Nana Patole) यांनीही ईव्हीएम बद्दल म्हटले की, या मुद्य्यावर कोणीच ऐकत नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयातही गेलो. त्यांनी म्हटलं हे सिद्ध करा. हेच कारण आहे की काँग्रेसला वाटतं की या मुद्य्यावर जन आंदोलनाशिवाय कोणताही दुसरा मार्ग नाही.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT