Mallikarjun Kharge Sarkarnama
देश

Mallikarjun Kharge on Prime Minister : पंतप्रधान पदासाठी खर्गेंची पसंती कुणाला? प्रचार संपताच जाहीर केले नाव...

Lok Sabha Election Result India Alliance Prime Minister Congress Mallikarjun Kharge : इंडिया आघाडीची सत्ता आल्यास पंतप्रधान पदासाठी राहुल गांधी यांना पसंती असेल, असे विधान मल्लिकार्जून खर्गेंनी केलं आहे.

Rajanand More

Congress Politics : लोकसभा निकालाकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. एकीकडे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच विराजमान होतील, असा ठाम विश्वास भाजपला आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीही या रेसमध्ये असल्याचे सांगत आहे. मात्र, पंतप्रधान कोण, याचे उत्तर थेटपणे कोणताही नेता देताना दिसत नाही.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी मात्र प्रचार संपताच पंतप्रधान पदासाठी पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधींना आपले समर्थन असल्याचे जाहीर केले आहे. राहुल हे पंतप्रधान पदासाठी आपली पसंती असल्याचे ते म्हणाले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान इंडिया आघाडीतील नेत्यांकडून पंतप्रधान पदाचा चेहरा कोण, यावर भाष्य केले गेले नाही. असे असले तरी भाजपकडून मात्र नरेंद्र मोदी विरुध्द राहुल गांधी असा सामना असल्याचे सांगितले जात होते. मात्र, इंडियातील काही नेत्यांची राहुल यांच्या नावाला नापंसती आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खर्गे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शुक्रवारी राहुल यांचे नाव घेतले. ते म्हणाले, राहुल गांधी यांनी निवडणुकीआधी भारत जोडो यात्रेचे नेतृत्व केले. आक्रमकपणे प्रचार केला. आघाडीतील इतर नेत्यांसोबत सभा घेतल्या. पंतप्रधान मोदींवर थेट हल्ला चढवला.

पंतप्रधान पदासाठी राहुल गांधी यांनाच माझी पसंती असेल, असे खर्गे यांनी ठामपणे सांगितले. मात्र, याच खर्गेंनी यापुर्वी प्रचारादरम्यान एकदाही त्यांचे नाव घेतले नाही. इंडिया आघाडीचा विजय झाल्यास आम्ही एकत्रितपणे बसून पंतप्रधान ठरवू, असे खर्गे म्हणाले होते.

खर्गेंचीही होती चर्चा

दरम्यान, लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधी इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये खर्गेंचे नाव पुढे आल्याची चर्चा होती. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह इतर काही नेत्यांची खर्गे यांच्या नावाला पसंती दिल्याची जोरदार चर्चा होती.

इंडिया आघाडीची एक जूनला बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत निवडणुकीचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीत पंतप्रधान पदाविषयी चर्चा होणार का, याबाबत उत्सुकता आहे.

प्रियांका गांधींना होता पाठिंबा

प्रियांका गांधी यांनी निवडणूक लढवावी, यासाठी खर्गे आग्रही होते. याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, प्रियांका यांनी निवडणुकीत उतरावे, असे माझे मत होते. पण राहुल यांना त्यांच्या मतदारसंघातील प्रचारासाठी त्या हव्या होत्या. कारण ते देशभरात प्रचार करत होते.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT