Mallikarjun Kharge
Mallikarjun Kharge  Sarkarnama
देश

Karnataka Chief Minister : कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाबाबत काँग्रेस अध्यक्ष खर्गेंचे मोठे विधान

सरकारनामा ब्यूरो

बंगळूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने तब्बल १३६ जागा जिंकत ३४ वर्षांनंतर अशा प्रकारच्या यशाची पुनरावृत्ती केली आहे. राज्यात स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री कोण, अशी चर्चा सुरू झाली आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांची नावे आघाडीवर आहेत. काँग्रेसचा मुख्यमंत्री कोण असणार, यावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी भाष्य केले आहे. (Congress president Mallikarjun Kharge's big statement regarding the Chief Ministership of Karnataka)

कर्नाटक (Karnataka)) विधानसभा निवडणुकीचा निकाल हे काँग्रेस पक्षाचे (Congress) नेते आणि कार्यकर्त्यांच्या ‘सामूहिक प्रयत्नांचे फळ’ आहे, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी सांगितले. बहुचर्चित विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि देशातील सर्वात जुन्या पक्षाला म्हणजेच काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले.

कर्नाटक निवडणुकीचा निकाल आणि पुढील मुख्यमंत्री (Chief Minister) यावर भाष्य करताना काँग्रेस अध्यक्ष खर्गे म्हणाले की, काँग्रेस पक्ष सर्वसंमतीने निर्णय घेऊन मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार निवडेल. सर्व समाजातील लोकांनी काँग्रेसला निवडणुकीत मतदान केले आहे. निवडणुकीत काँग्रेसने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी पक्ष कसोशीने प्रयत्न करेल, अशी ग्वाहीही खर्गे यांनी दिली.

मल्लिकार्जून खर्गे हे मूळचे कर्नाटकचे असून त्यांच्यासाठी विधानसभेची ही निवडणूक जिंकणे महत्त्वाची होते. खर्गे अध्यक्ष झाल्यानंतर गुजरात आणि हिमाचल प्रदेशची निवडणूक झाली, त्यात पक्षाला गुजरातमध्ये अपयश, तर हिमाचलमध्ये काँग्रेसला यश मिळाले होते. त्यामुळे गृहराज्यात जिंकणे खर्गे यांच्यासाठी आवश्यकच होते. चित्तापूर मतदारसंघातून त्यांचा मुलगा प्रियांक खर्गे विजयी झाला आहे.

खर्गे म्हणाले, "कर्नाटकच्या जनतेने काँग्रेसला भरघोस जनादेश दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आम्ही जनादेशाचा सन्मान करू. आम्ही आमच्या जाहीरनाम्यात जाहीर केलेल्या सर्व कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करू. मी राहुल गांधी, प्रियांका गांधी यांचे आभार मानतो. बरे वाटत नसतानाही सोनिया गांधींनी प्रचार केला. या सर्वांच्या प्रयत्नातून पक्षाला हे यश आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT