Mamata Banerjee on Sanjay Roy Punishment Sarkarnama
देश

Mamata Banerjee on Sanjay Roy Punishment : संजय रॉयला सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेवर ममता बॅनर्जी समाधानी नाहीत, म्हणाल्या...

RG Kar Rape-Murder Case Verdict : जाणून घ्या, न्यायालयाने संजय रॉयला फाशी ऐवजी जन्मठेपेची शिक्षा का सुनावली अन् शिक्षा सुनावण्याआधी संजय रॉयला काय म्हणाले होते न्यायाधीश?

Mayur Ratnaparkhe

Sanjay Roy life imprisonment in RG Kar Rape-Murder Case : कोलकातामधील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर तिची झालेली निघृण हत्याप्रकरणी न्यायालयाकडून या गुन्ह्यातील दोषी संजय रॉय यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मात्र न्यायालयाने सुनावलेल्या या शिक्षेवर पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी संतुष्ट नाहीत. त्यांनी हे बोलून दाखवले आहे.

तसेच, ममता बॅनर्जींनी(Mamata Banerjee) असाही दावा केला की, तपासाची जबाबदारी कोलकाता पोलिसांकडून जबदरदस्ती काढून घेण्यात आली होती. जर ही जबाबदारी कोलकाता पोलिसांकडेच असती तर नक्कीच दोषीला मृत्यूची शिक्षा मिळाली असती. मुर्शिदाबाद जिल्ह्यात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी या प्रकरणात सीबीआय तपासावर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी दावा केला की, सर्वांनीच मृत्यूच्या शिक्षेची मागणी केली होती. परंतु न्यायालयाने मरपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हे प्रकरण आमच्याकडून जबरदस्ती काढून घेण्यात आलं. जर हे प्रकरण कोलकाता पोलिसांकडे असतं, तर आम्ही नक्कीच बघितलं असतं की त्याला मृत्यूची शिक्षा कशी होईल.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी म्हटले की, आम्हाला नाही माहिती की तपास कशाप्रकारे झाला. कोलकाता पोलिसांनी तपास केलेल्या अशा अनेक प्रकरणांमध्ये मृत्यूची शिक्षा ठोठवली गेलेली आहे. मी संतुष्ट नाही. सियालदह कोर्टाने संजय रॉयला(Sanjay Roy) आरजी कर मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये ड्यूटीवर असणाऱ्या डॉक्टरवर बलात्कार आणि नंतर हत्या केल्याच्या प्रकरणात दोषी ठरवत मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

सियालदहमध्ये अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अनिरबन दास यांच्या न्यायालयाने शनिवारी रॉयला मागील वर्षी 9 ऑगस्ट रोजी रूग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर केलेल्या अत्याचार प्रकरणी दोषी ठरवलं होतं, या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती.

हा दुर्मिळातील दुर्मिळ खटला नाही -

शिक्षेची घोषणा करताना अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अनिरबन दास यांनी म्हटले की, हा दुर्मिळातील दुर्मिळ खटला नाही. त्यामुळेच या प्रकरणी गुन्हेगारास जन्मठेपेची शिक्षा सुनावत आहेत. संजय रॉयला शिक्षेसोबतच 50 हजारांचा दंडही ठोठवण्यात आला आहे.

संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावल्या गेल्यानंतर न्यायालयाने राज्य सरकारला पीडितेच्या कुटुंबास 17 लाख रुपयांची भरपाई देण्याचे निर्देश दिले. यावर पीडितेच्या आई-वडिलांनी म्हटले की, त्यांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई नकोय. संजय रॉयला कलम 64,66 आणि 103(1) नुसार दोषी ठरवण्यात आलं आहे. यानुसार दोषीसाठी फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षेची तरतूद आहे. तर न्यायाधीशांनी संजय रॉयला जन्मठेप सुनावली आहे.

शिक्षा सुनावण्याआधी न्यायाधीश संजय रॉयला काय म्हणाले? -

शिक्षा सुनावण्याआधी न्यायाधीशांनी संजय रॉयला म्हटले की, मी तुम्हाला आधीच सांगितले होते की तुमच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप जसे की बलात्कार आणि हत्येचे आरोप सिद्ध झाले आहेत. यावर संजय रॉय म्हणाला, मला विनाकारण अडकवलं गेलं आहे. मी नेहमीच रुद्राक्ष माळ धारण करतो. जर मी गुन्हा केला असता तर घटनास्थळीच रुद्राक्ष माळा तुटली असती. मला बोलू दिले गेले नाही. अनेक कागदांवर जबरदस्ती स्वाक्षरी घेतली गेली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT