Man held for brandishing knife during Congress leadee Harish Rawat program.

 

Sarkarnama

देश

सुरक्षेत मोठी चूक! माजी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात चाकू घेऊन स्टेजवर चढला तरूण

माजी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात चाकू घेऊन स्टेजवर तरूण चढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पंजाब दौऱ्यातील सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी झाल्याच्या मुद्द्यावरून सध्या गदारोळ सुरू आहे. काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते व उत्तराखंडचे (Uttarakhand) माजी मुख्यमंत्री हरीश रावत (Harish Rawat) यांच्या मंचावर एक तरुण हातात चाकू घेऊन चढल्याने आज खळबळ उडाली. यामुळे कार्यक्रमात मोठा गोंधळ झाला. या तरुणाला वेळीच ताब्यात घेतल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

रावत हे काशीपूरमध्ये काँग्रेस सदस्यता अभियानात सहभागी झाले होते. ते भाषण संपवून मंचावरील आपल्या खुर्चीवर बसताच एक तरुण धावत मंचावर आला. त्याने माईक हाती घेऊन जय श्रीरामच्या घोषणा देण्यास सुरवात केली. यामुळे त्याला थांबवण्यासाठी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते धावले. त्यावेळी त्याने चाकू बाहेर काढला. यामुळे पोलिसांसह काँग्रेस कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाली.

अखेर कार्यकर्त्यांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले. त्याला माईकपासून दूर नेण्यात आले आणि त्याच्याकडील चाकूही काढून घेण्यात आला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्याला मंचावरून खाली नेऊन पोलिसांच्या हवाली केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यातील सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी झाल्याच्या मुद्द्यावरून सध्या गदारोळ सुरू आहे. यामुळे काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. आता काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात चाकू घेऊन तरूण घुसल्याने आणखी वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार आहे.

उत्तराखंडमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक (Assembly Election) होणार आहे. त्यासाठी रावत यांनी जोरदार तयारीही सुरू केली होती. पक्षांच्या बैठकांसह भाजपच्या (BJP) आमदारांना पक्षात घेण्याची रणनीतीही त्यांनी बनविली होती. मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून त्यांनी दावेदारी सांगितली होती. परंतु, त्यांनी अचानक पक्षावर ट्विटबॉम्ब टाकत पक्ष सोडण्याचे संकेत दिले होते. यामुळे मोठी खळबळ उडाली होती.

उत्तराखंड काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी रावत यांना दिल्लीला बोलावण्यात आले होते. त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष गणेश गोडियाल आणि पक्षाचे नेते यशपाल आर्य यांनाही दिल्लीला बोलावण्यात आले होते. त्यांच्याशी दिल्लीत राहुल गांधींनी चर्चा केली होती. या बैठकीत अंतर्गत मतभेदांवर तोडगा काढण्यात आला. याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीत रावत हेच पक्षाचा चेहरा असतील, असा शब्द त्यांना देण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT