BJP News : भाजपमध्ये ज्या पद्धतीने माजी मंत्री विनोद तावडे यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून बाहेर काढत राष्ट्रीय राजकारणात नेण्यात आले, त्याच पद्धतीने आणखी एका नेत्याला राष्ट्रीय राजकारणात उतरवले जाण्याची शक्यता आहे. बिहार भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मंगल पांडे यांच्याबाबत सध्या बिहारमध्ये अशाच पद्धतीने चर्चा सुरु आहेत.
बिहार मंत्रिमंडळ विस्तारात मंगल पांडे यांना स्थान मिळाले नाही. पण गुरुवारी गांधी मैदानावर झालेल्या शपथविधी सोहळ्यादरम्यानच्या एका प्रसंगाने राजकीय वर्तुळात या नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. मंचावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगल पांडे यांना जवळ घेतले, मिठी मारली, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली आणि त्यांच्याशी संवाद साधला.
या भेटीनंतर, भाजपमधील त्यांच्या भविष्याबद्दल चर्चा सुरु झाली आहे. याकडे फक्त एक साधी भेट म्हणून नव्हे, तर एक राजकीय संकेत म्हणून बघितले जात आहे. भाजप त्यांना राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नियुक्त करू शकते किंवा त्यांच्याकडे एका मोठ्या राज्याचा कार्यभार सोपवू शकते, अशी चर्चा दबक्या आवाजात आहे.
महाराष्ट्रात 2019 मध्ये तत्कालीन मंत्री विनोद तावडे यांना विधानसभेचे तिकीट नाकारण्यात आले. निवडणुकीनंतर त्यांना काही वर्षांत राष्ट्रीय चिटणीस म्हणून जबाबदारी देण्यात आली. बिहारचे प्रभारी, चंदीगढ महापौरपद निवडणुकीचे प्रभारीपदी त्यांची नियुक्ती झाली. या दरम्यान त्यांचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून प्रमोशन झाले. तावडे हे आज पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वातील विश्वासू चेहरा मानले जातात.
याचमुळे बिहार मंत्रिमंडळातून वगळण्यात आले म्हणजे मंगल पांडे यांच्या राजकीय प्रवासाला पूर्णविराम मिळाला असे मानण्यास भाजपमध्ये तरी कुणी तयार नाही. यापूर्वी बिहारमधूनच नितीन नबीन यांना आधी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नेमण्यात आले होते. नंतर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.