मणिपूर : पाच राज्यांच्या निवडणुकीत ३ राज्यांमधील मतदान पार पडल्यानंतर उत्तर प्रदेशमधील पाचव्या टप्प्यातील आणि मणिपूरमधील पहिल्या टप्प्यातील मतदान २८ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. यात भाजप, काँग्रेस विविध पक्ष संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले आहेत. मात्र अशातच मतदानाच्या ३ दिवस आधी मणिपूरमध्ये कुकी नॅशनल ऑर्गनायजेशन या १७ फुटीरतावादी गटांच्या बंदी असलेल्या हिंसक संघटनेनं भाजपला पाठिंबा जाहिर केला आहे. तसेच मतदारांनी भाजपलाच मतदान करावे. भाजप व्यतिरिक्त अन्य पक्षाला मतदान करणारा व्यक्ती समुहाच्या विरोधात समजला जाईल आणि त्याला पुढच्या परिणामांना सामोर जावं लागेल, अशी स्पष्ट धमकी दिली आहे.
मणिपूरमधून स्वतंत्र राज्याची मागणी करत कुकी नॅशनल ऑर्गनायजेशन मागच्या ३३ वर्षांपासून मणिपूरमध्ये सक्रिय आहे. त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जावू लागल्यानंतर संघटनेने बंदुक उचलून आपल्या सैन्याची स्थापना केली आणि स्वतंत्र राज्याची मागणी लावून धरली. या संघटनेचे मुख्यालय भारताचा शेजारील देश म्यानमारमध्ये आहे. कुकी नॅशनल ऑर्गनायजेशनने नुकताच दावा केला आहे की मणिपूरमध्ये भाजपचे सरकार सत्तेत आल्यास पुढील ५ वर्षात त्यांच्या मागणीवर चर्चा करुन पुढील कार्यवाही केली जाईल असे केंद्र सरकारने वचन दिले आहे.
मणिपूरमध्ये जवळपास ३० टक्के मतदार कुकी समाजातील आहेत. मणिपूरशिवाय आसाम, त्रिपूरा, नागालँड, मिझोराम आणि मेघालयमध्ये देखील या समुदायाचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे भाजपचे स्थानिक नेते कुकी नॅशनल ऑर्गनायजेशनच्या संपर्कात असल्याचे आणि त्यांना केंद्र सरकारचा आशीर्वाद प्राप्त असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच बुधवारी मणिपूरमध्ये एका प्रचारसभेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कुकी समुदायाच्या विविध संघटनांशी चर्चा करुन त्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागणीवर विचार केला जाईल. कुकी समुदायातील कोणत्याही तरुणाला इथून पुढे शस्त्र हातात घ्यावे लागणार नाही असे आश्वासन दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.