PM Narendra Modi
PM Narendra Modi Sarkarnama
देश

Mann Ki Baat News : ‘मन की बात’ला मोठा ब्रेक; पंतप्रधान मोदींनीच केली घोषणा...

Rajanand More

New Delhi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील हा शेवटचा भाग होता. आतापर्यंत या कार्यक्रमाचे 110 भाग झाले आहेत. आज मोदींनी नैसर्गिक शेतीचे महत्व अधोरिखित करत रासायनिक खतांचा वापर न करण्याचे आवाहन केले. तसेच आज देशभराभरात अनेक महिला नैसर्गिक शेतीचा विस्तार करत असल्याचे ते म्हणाले. (Mann Ki Baat News)

'मन की बात' हा कार्यक्रम आता पुढील तीन महिने होणार नाही. याविषयी पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) माहिती दिली. ते म्हणाले, पुढील तीन महिने मी आता मन की बातचे कार्यक्रम करणार नाही. मन की बातमध्ये देशातील सामुहिक शक्तीची अनुभूती येते. हा एकप्रकारे जनतेचा, जनतेसाठी आणि जनतेद्वारे तयार होणारा कार्यक्रम आहे. आता पुढील तीन महिने मन की बातचे प्रसारण होणार नाही.

देशात लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) होणार आहे. मार्च महिन्यात आचारसंहिता लागू शकते. राजकीय मर्यादेचे पालन करावे लागणार आहे. निवडणुकीच्या काळात आता पुढील तीन महिने प्रसारण होणार नाही. आता तुमच्याशी या कार्यक्रमात संवाद होईल, तो 111 वा भाग असले. पुढील भागाची सुरूवात 111 या अंकाने होणार, यापेक्षा चांगले काय असले, असे मोदी म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, आज मन की बातमध्ये बोलताना पंतप्रधान म्हणाले, रेन वॉटर हॉर्वेस्टिंगच्या माध्यमातून पाण्याची बचत केली जाऊ शकते. वन्य प्राण्यांच्या सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाचा कौशल्याने वापर होत आहे. मागील वर्षांत सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे वाघांची संख्या वाढली आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्ये वाघांची संख्या अडीचशेपेक्षा जास्त झाली आहे. मनुष्य आणि वाघांच्या संघर्ष टाळण्यासाठी कृत्रिम बुध्दिमत्तेचा (एआय) वापर केला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT