Manohar Lal Khattar Sarkarnama
देश

Manoharlal Khattar on Arvind Kejariwal: आम आदमी पार्टीला महागात पडलं केजरीवालंचं 'ते' विधान; मनोहरलाल खट्टरांनी केला दावा!

Manoharlal Khattar on Delhi Election : ''अरविंद केजरीवाल यांनी आणखी एक मोठा वादा केला होता, तो म्हणजे...'' असंही मनोहरलाल खट्टर यांनी म्हटलं आहे.

Mayur Ratnaparkhe

Delhi Election Result 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला पराभवाचा सामना करावा लागला आहे . पार्टीचे संयोजक केजरीवाल त्यांचा स्वत:चा मतदारसंघही वाचवू शकले नाहीत. तर आता आम आदमी पार्टीच्या पराभवावर हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीयमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी मोठा दावा केला आहे.

मनोहरलाल खट्टर(Manoharlal Khattar) यांनी रविवारी म्हटले की, जर आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी यमुना नदीच्या पाण्यात हरियाणा सरकारने विष मिसळवल्याचा आरोप केला नसता, तर त्यांचा पक्ष दिल्ली विधानसभा निवडणुकीत पाच-सात जागा आणखी जिंकला असता. त्यांनी म्हटले की, अनेक राज्यांमध्ये जलविवाद आहे, परंतु केजरीवालांची सवय आहे की जर ते त्यांच्या वचनबद्धतेच्या पालनात अयशस्वी ठरले तर ते त्याचा दोष दुसऱ्यांना देतात.

केंद्रीयमंत्री मनोहरलला खट्टर यांनी पुढे म्हटले की, ''अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) यांनी आणखी एक मोठा वादा केला होता. जर ते यमुनेची स्वच्छता करण्यात अयशस्वी ठरले तर ते 2025 ची विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत. हे त्यांच्यावतीने एक आव्हानात्मक वक्तव्य होतं. मात्र जेव्हा केजरीवाल यमुना स्वच्छ करण्यात अयशस्वी ठरले, तर ते म्हणाले की हरियाणाकडून हे पाणी विषारी केलं जात आहे आणि हेच वक्तव्य त्यांना अतिशय महागात पडलं''

तसेच, त्यांनी म्हटले की, '' दिल्लीमध्ये 40 टक्क्यांपेक्षा अधिक लोक हरियाणातून आहेत. या वक्तव्यामुळे हरियाणा आणि दिल्लीतील लोकांचा अपमान झाला. दिल्लीसाठी(Delhi) पाणी हरियाणाच्या पल्ला येथून येते. दिल्ली जल बोर्ड आणि दिल्ली प्रदूषण बोर्डद्वारे पल्ला येथे पाण्याची गुणवत्ता मानकानुसार आढळली आहे.

दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान केजरीवालांनी आरोप केला होता, की हरियाणा सरकारने युमनेच्या पाण्यात विष मिसळवलं होतं. तसेच त्यांनी हा देखील दावा केला होता की, वेळीच जल बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी बघितले नाहीतर मोठे नुकसान झाले असते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT