Karnataka Election Result- BJP and Congress
Karnataka Election Result- BJP and Congress Sarkarnama
देश

Karnataka Election Result: कर्नाटकच्या निवडणुकीत भाजप, काँग्रेस अन् 'जेडीएस'च्या 'या' बड्या नेत्यांचा पराभव

सरकारनामा ब्यूरो

Karnataka Election Result 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 224 जागांपैकी जवळपास 135 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजपला फक्त 65 जागांवर विजय मिळाला. जेडीएसला केवळ 19 जागा मिळाल्या आहेत. कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी देखील या निवडणुकीत जोरदार प्रचार केला होता. मात्र, तरी देखील भाजपला यश मिळवता आलं नाही. कर्नाटकमध्ये काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत काँग्रेसचं अभिनंदन केलं आहे. काँग्रेसनं कर्नाटकात जोरदार मुसंडी मारत एकहाती सत्ता मिळवली आहे.

असं असलं तरी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत अनेक बड्या नेत्यांचा पराभव झाला आहे. तर अनेक बड्या नेत्यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. या निवडणुकीत डी.के.शिवकुमार तब्बल एक लाख मतांनी विजयी झालेत. तर सिद्धरामय्या हे देखील मोठ्या मतांनी विजय झाले आहेत. माजी मुख्यमंत्री एच.डी कुमारस्वामी, टी.रघुमूर्ती यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे रमाकांत कोंडूसकर यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. याबरोबरच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भाची अजंली निंबाळकर यांना देखील पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांचा मुलगा निखिल यांचा देखील पराभव झाला आहे.

काँग्रेसचे एचए इक्बाल हुसैन यांनी 10 हजार मतांनी एचडी कुमारस्वामी यांच्या मुलाचा पराभव केला आहे. तर भाजप नेते आर अशोक यांचा 1 लाखांहून अधिक मतांनी पराभव झाला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा प्रियांक यांनी भाजपच्या मणिकांत राठोड यांचा 13,000 हून अधिक मतांनी पराभव केला.

(Edited By : Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT