नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) सायबर क्राईम युनिटने मध्य प्रदेशातील (Madhy pradesh) इंदूरमधून (Indore) 'सुल्ली डील्स' अॅप (SulliDeals) बनवणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. २५ वर्षीय ओंकारेश्वर ठाकूर (Onkareshwar Thakur) इंदूरच्या न्यूयॉर्क सिटी टाऊनशिपचा रहिवासी आहे. पोलिसांनी त्याला त्याच्या घरातून अटक केली आहे. त्याने आयपीएस अकादमी इंदूरमधून बीसीए केले आहे.
ओकांरेश्वर ठाकूरने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तो ट्विटरवरील एका ट्रेड-ग्रुपचा सदस्य होता आणि एका विशिष्ट समाजातील महिलांची बदनामी करण्यासाठी आणि त्यांना ट्रोल करण्यासाठी तो ट्विटरवर महिलांविरोधी विचार पसरवत असे. इतकेच नव्हे तर, त्यासाठी त्याने गिटहबवर एक कोड विकसित केल्याची कबुलीही दिली आहे.
ओंंकारेश्वरने ग्रुपच्या सर्व सदस्यांना गिटहबमध्ये प्रवेश होता. त्याने हे अॅप त्याच्या ट्विटर अकाउंटवरही शेअर केले आहे. ग्रुप सदस्यांनी त्या विशिष्ट समाजातील महिलांचे फोटो अपलोड केल्याचेही त्याने सांगितले.ओंकारेश्वर जानेवारी 2020 मध्ये @gangescion या ट्विटर हँडलवरून ट्विटरवरील एका ग्रुपमध्ये सामील झाला होता. या गटाचे नाव व्यापार महासभा असे होते. या ग्रुपमध्ये मुस्लीम महिलांना ट्रोल करण्यावरून चर्चा होत असे झाला होता.
यानंतर त्याने गिटहबवर सुली डील्स नावाचे अॅप तयार केले. मात्र सुली डील्सचा मुद्दा प्रकाशात येताच त्याने त्याचे सर्व सोशल मीडियावरील सर्व फूटप्रिंट हटवले. आता त्याच्याकडे सापडलेल्या गॅजेट्सचा पोलिस तपास करत आहेत. दरम्यान, गेल्या वर्षी लाँच केलेल्या 'सुल्ली डील्स' अॅपवर एका विशिष्ट समाजातील महिलांची छायाचित्रे पोस्ट करून त्यांच्या 'लिलावा'साठी ती सूचीबद्ध करण्यात आली होती. परवानगीशिवाय काढलेली ही छायाचित्रे मॉर्फ करण्यात आली होती.
दरम्यान, या ओंकारेश्वरला अटक केल्यानंतर आणखी एक माहिती समोर आली आहे. 'बुल्ली बाई' प्रकरणाच्या तपासात अटक केलेल्या नीरज बिष्णोई ओंकारेश्वर ठाकूरच्या संपर्कात होता. दिल्लीतील किशनगढ पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे तपास सुरू आहे. या दोघांची अटकेमुळे पोलिसांना या प्रकणात मोठे यश आले असल्याचे दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.