mbbs student dies covid 19 after taking corona vaccine in bihar
mbbs student dies covid 19 after taking corona vaccine in bihar  
देश

कोरोनाची लस घेतलेल्या एमबीबीएसच्या विद्यार्थ्याचा मृत्यू अन् नऊ जण पॉझिटिव्ह

वृत्तसंस्था

पाटणा : देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. असे असताना एमबीबीएसच्या एका विद्यार्थ्याने कोरोना लस घेतल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याचबरोबर लस घेतलेल्या इतर नऊ विद्यार्थ्यांनाही कोरोनालाची लागण झाली आहे. 

जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास 16 जानेवारीला देशात सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन झाले होते. केंद्र सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यात पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. 

लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना दिली जात आहे. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांचाही यात समावेश आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत मिळेल मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी 250 रुपये मोजावे लागतील. यात 100 रुपयांच्या सेवा शुल्काचा समावेश असेल, असे सरकारने जाहीर केले आहे.  

एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्याचा कोरोना लशीचा पहिला डोस घेतला होता. त्याचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्याचे नाव शुभेंदू असे आहे. तो बेगुसराय जिल्ह्यातील दहिवा गावातील होता. त्याने 2016 मध्ये एमबीबीएसला प्रवेश घेतला होता. त्याने कोरोना लशीचा पहिला डोस फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात घेतला होता. त्याचा मृत्यू 1 मार्चला झाला. 

शुभेंदू हा महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहत होता. त्याला 24 फेब्रुवारीला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होऊ लागला. त्यानंतर त्याची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याच्यासोबत राहणाऱ्या नऊ विद्यार्थ्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. 

सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  सध्या दोन कोरोना लशी उपलब्ध असून, आणखी सात कोरोना लशींवर काम सुरू असल्याचे सरकारने नुकतेच जाहीर केले होते. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT