Delhi MCD Election Result  Sarkarnama
देश

Delhi MCD Election Result : सत्येंद्र जैन, मनीष सिसोदियांना झटका

Delhi MCD Election Result : .कार्यकर्ते पक्ष कार्यालयाबाहेर जमलेआहेत. उत्साहाने घोषणाबाजी सुरु झाली आहे.

सरकारनामा ब्युरो

Delhi MCD Election : आप आदमी पक्षाच्या निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. यात अनेक मोठ्या नेत्यांना झटका बसला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, मंत्री सत्येंद्र जैन यांच्या बालेकिल्ल्यात आपचा सुपडा साफ झाला आहे. दर दुसरीकडे दिल्ली भाजपचे नेते आदेश गुप्ता यांच्या परिसरात भाजप उमेदवारांचा पराभव झाला आहे.

सत्येंद्र जैन यांच्या शकूरबस्ती परिसरात आपचा सुपडा साफ झाला आहे. येथील तीनही जागांवर भाजपने बाजी मारली आहे. येथे आपला एकही जागा जिंकला आली नाही. या निवडणुकीत सत्येंद्र जैन सर्वाधिक चर्चेत राहिले. मनी लॅान्ड्रिंग प्रकरणात सध्या ते तिहार कारागृहात आहेत. निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जैन हे प्रामाणिक असल्याचा दाखला भाजपला देत होते.

15 वर्षांपासून दिल्ली महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे. 2017 मध्ये, भाजपने तत्कालीन 270 पैकी 181 नगरपालिका वॉर्ड जिंकले होते, तर AAP फक्त 48 जागा जिंकल्या होत्या. कॉंग्रेस 30 जागा जिंकून तिसऱ्या स्थानावर होती.

दुसऱ्या बाजूला आम आदमी पक्षाच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.कार्यकर्ते पक्ष कार्यालयाबाहेर जमलेआहेत. उत्साहाने घोषणाबाजी सुरु झाली आहे. आपचे नेतेही पक्ष कार्यालयात दाखल होऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर AAP चे मुख्य प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी आपला पक्ष विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT