Mehbooba Mufti
Mehbooba Mufti sarkarnama
देश

Mehbooba Mufti यांना सरकारी बंगला सोडण्याचे आदेश ; मेहबुबा मुक्ती न्यायालयात जाणार

सरकारनामा ब्युरो

Mehbooba Mufti : जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुक्ती यांना जन्मू काश्मिर सरकारने त्यांचा सरकारी बंगला खाली करण्यासाठी नोटिस दिली आहे. मेहबुबा मुक्ती या सध्या श्रीनगर येथील अतिसुरक्षा असलेल्या ‘फेयर व्यू’या बंगल्यात राहत आहेत. हा बंगला खाली करण्यासाठी सरकारने त्यांना नोटिस बजावली आहे. (mehbooba muftilatest news)

याबाबत मेहबुबा मुक्ती म्हणाल्या, "फेयर व्यू खाली करण्यासाठी यापूर्वीही मला नोटिस आली होती. हा बंगला माझे वडील मुक्ती मोहम्मद सईद यांना सरकारने डिसेंबर २००५ मध्ये दिला होता. तेव्हा ते मुख्यमंत्री होते.सध्या मला मिळालेल्या या नोटिशीबाबत मी न्यायालयात जाणार आहे. मी सुरक्षितपणे राहू शकेल, अशी सुरक्षित जागा सध्या माझ्याजवळ नाही,याबाबत मी माझ्या कायदा सल्लागारांशी चर्चा करणार आहे,"

"हा बंगला सरकारी असून मुख्यमंत्र्यांसाठी आहे. तुम्ही आता मुख्यमंत्री नाही, त्यामुळे तुम्हाला हा बंगला सोडावा लागणार आहे," असे सरकारने मेहबुबा मुक्ती यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. "तुम्हाला सुरक्षित जागा हवी असल्यास ती देण्यासाठी सरकार प्रयत्न करेन," असे सरकारने त्यांना सांगितले आहे.

जम्मू-काश्मिर सरकारच्या नियमानुसार मेहबुबा मुक्ती यांच्या या बंगल्याच्या देखभालीसाठी ३५ हजार रुपये, दुरध्वनी खर्च ४८ हजार रुपये,वीजबील १५०० रुपये महिना, याशिवाय गाडी,चालक, पेट्रोल भत्ता आदी सरकारकडून दिले जाते. ३१ आँक्टोंबर २०१९ मध्ये बदलेल्या नियमानुसार या सुविधा रद्द करण्यात आल्या आहेत.

यापूर्वी माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला, गुलाम नबी आझाद, उमर अब्दुल्ला यांनीही सरकारी बंगले सोडले आहेत. मेहबुबा मुक्ती यांनी सुरक्षेच्या कारणास्तव हा बंगला सोडला नसल्याची माहिती समोर आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT