Meta AI Layoffs | AI Job Cuts | Employee Lawsuit Sarkarnama
देश

Meta AI Layoffs : AI चा धक्कादायक वापर! दिग्गज कंपनीने हजारो आजारी, दिव्यांग कर्मचाऱ्यांना टार्गेट करून नोकरीवरून काढलं

Meta artificial intelligence layoffs : मेटाच्या माजी कर्मचाऱ्यांनी कंपनीविरोधात न्यायालयात दावा दाखल केला आहे. मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या कर्मचारी कपातीदरम्यान कंपनीने एका विशेष AI सॉफ्टवेअरचा वापर केला आणि त्याद्वारे दिव्यांग तसेच वैद्यकीय रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Jagdish Patil

Meta employee lawsuit : कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI चा जगभरातील अनेक क्षेत्रातील नोकऱ्यांवर मोठा परिणाम होत असल्याचं समोर येत आहे. AI च्या मदतीने गुगल, अॅमेझॉनसह अनेक मोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपात केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

अशातच आता फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी असलेल्या मेटाने कर्मचारी कपाती दरम्यान 'एआय'चा वापर करून आजारी, दिव्यांग कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे मेटा आता नव्या वादात अडकली आहे.

मेटाच्या २६ माजी कर्मचाऱ्यांनी कंपनीविरोधात कॅलिफोर्नियातील न्यायालयात दावा दाखल केला आहे. मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या कर्मचारी कपातीदरम्यान कंपनीने एका विशेष AI सॉफ्टवेअरचा वापर केला आणि त्याद्वारे दिव्यांग तसेच वैद्यकीय रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

यंदा मेटाने आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे १० टक्के, म्हणजेच जवळपास ८ हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला होता. या प्रक्रियेत कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी AI-आधारित प्रणालीचा वापर करण्यात आल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या या आरोपामुळे आता एकच खळबळ उडाली आहे.

शिवाय असा एआयचा असा धक्कादायक वापर होऊ लागल्यास अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागतील अशी भीती व्यक्त केली जात आहे. याचिकेनुसार, आजारपणामुळे किंवा उपचारांसाठी वैद्यकीय रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांकडून कमी प्रमाणात काम होते. AI ने याच निकषावर त्यांना कमी कामगिरी करणारे कर्मचारी समजून त्यांच्या नावांची कपातीसाठी शिफारस केली.

मात्र, मेटा कंपनीने हे सर्व आरोप स्पष्टपणे फेटाळले आहेत. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्याचा निर्णय कोणत्याही AI प्रणालीने घेतलेला नाही. हा निर्णय कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सामूहिकपणे घेतला असून AI ने अंतिम निर्णय घेतल्याचा दावा चुकीचा असल्याचं स्पष्टीकरण कंपनीने दिलं आहे.

तर ज्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आलं आहे त्यांनी असा आरोप केला आहे की, मेटाने सरकारी नियम आणि कामगार कायद्यांचे उल्लंघन केले आहे. कायद्यानुसार, गर्भवती महिला, दिव्यांग कर्मचारी किंवा आजारपणामुळे वैद्यकीय रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांशी कोणत्याही प्रकारचा भेदभाव करता येत नाही.

तर हे प्रकरण आता कॅलिफोर्नियातील न्यायालयात प्रलंबित असून, या खटल्याच्या निकालाकडे संपूर्ण जगातील कर्मचाऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. शिवाय या निकालाचा निर्णय देताना न्यायालय AI बाबत काही नियमावली जाहीर करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT