Charanjit Channi 
देश

मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर होताच भाजपनं महिला IAS चं प्रकरण काढलं बाहेर!

भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी चन्नी यांच्याबाबतची एक बातमी ट्विट केली आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची आमदार चरणजीतसिंग चन्नी (CharanjitSingh Channi) हे सोमवारी शपथ घेणार आहेत. चन्नी यांच्या रुपानं पंजाबला पहिला दलित शीख मुख्यमंत्री मिळणार आहे. पण शपथविधी आधीच भाजपनं चन्नी यांच्या निवडीवरून टीका केली आहे. भाजपनं चन्नी यांच्याशी संबंधित एक जुनं प्रकरण उकरून काढलं आहे. ( #MeToo accused as CM of Punjab says Amit Malviya)

भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी चन्नी यांच्याबाबतची एक बातमी ट्विट केली आहे. तीन वर्षांपुर्वीच्या #MeToo प्रकरणातील चरणजीतसिंग चन्नी यांना काँग्रेसनं मुख्यमंत्री म्हणून निवडलं आहे. 2018 मध्ये एका महिला IAS अधिकाऱ्याला मोबाईलवर असभ्य संदेश पाठविल्याचा आरोप त्यांच्या होता. हे प्रकरण दाबण्यात आलं होतं. पण पंजाब महिला आयोगानं नोटीस पाठवल्यानंतर ते समोर आलं, असं मालवीय यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. यावरून त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. 

आयोगाच्या मनिषा गुलाटी यांनी सरकारविरोधात आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. IAS अधिकाऱ्याने स्वत:ची बदली पंजाबबाहेर करून घेतली आहे. त्यांच्याकडून माझ्यावर दबाव वाढला होता, त्यामुळं मी नोटीस पाठवली. राज्याच्या मुख्य सचिव महिला आहेत. पक्षाच्या अध्यक्ष महिला आहेत. मग तरीही एका महिला आयएएस अधिकाऱ्याला न्याय का मिळत नाही, असा इशारा गुलाटी यांनी काही दिवसांपूर्वी दिला आहे. 

कोण आहेत चरणजीतसिंग चन्नी?

चरणजीतसिंग चन्नी हे अमरिंदरसिंग यांच्या मंत्रिमंडळात तंत्र शिक्षण मंत्री होते. चमकौर साहिब विधानसभा मतदारसंघातून ते 2007 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर 2012 आणि 2017 मध्येही ते निवडूण आले. 2015 ते 2016 या कालावधीत ते विरोधी पक्षनेते होते. तर अमरिंदरसिंग यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडं तंत्र शिक्षण, पर्यटन व सांस्कृतिक हे विभाग होते. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री ठरतील. 

चन्नी यांचे वडिल एस. हरसा सिंग यांच्यापासून चन्नी यांना राजकारणाचे धडे मिळाले. ते खरार या गावाचे सरपंच होते. त्यानंतर ब्लॉक कमिटीचे अध्यक्षही झाले. याच काळात शालेय शिक्षण घेणारे चरणजीत सिंग यांचा राजकारणातील रस वाढू लागला. शालेय विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरूवात झाली. चन्नी हे तीन टर्म नगरसेवक होते. तसेच खरार नगर परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. 2007 मध्ये पहिल्यांदा त्यांना काँग्रेसकडून विधानसभेचे तिकीट मिळाले. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT