Satya Nadella and Narendra Modi Sarkarnama
देश

पद्मभूषण जाहीर होऊनही 'मायक्रोसॉफ्ट'च्या सत्या नाडेलांचं मौन!

केंद्र सरकारने सत्या नाडेला (Satya Nadella) यांना पद्मभूषण सन्मान जाहीर केला आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म सन्मान (Padma Awards) जाहीर केले आहेत. यात जागतिक पातळीवर तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांचे नेतृत्व करणाऱ्या भारतीयांचा गौरव करण्यात आला आहे. गुगलचे (Google) मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई (Sundar Pichai) आणि मायक्रोसॉफ्टचे (Microsoft) मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला (Satya Nadella) यांचा समावेश आहे. पिचाई यांनी याबद्दल सरकारचे आभार मानले असले तरी नाडेला मात्र, यांनी यावर काहीही प्रतिक्रिया दिली आहे.

केंद्र सरकारने गुगलचे सुंदर पिचाई आणि मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला यांना पद्मभूषण जाहीर केले आहे. हे दोघेही भारतीय आहेत. ते सध्या गुगल आणि मायक्रोसॉफ्ट या जगातील सर्वांत मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांची धुरा सांभाळत आहेत. त्यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरवण्यात आले आहे. मूळचे भारतीय असलेल्या या दोघांनी भारतीयांची मान जगभरात उंचावल्याने सरकारने त्यांचा सन्मान करण्याचा सरकारचा मानस होता. यानंतर पिचाई यांनी तातडीने सरकारचे आभार मानले आहेत. मात्र, नाडेला यांनी मौन धारण केले आहे. यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पद्म सन्मान समितीचे पिचाई यांनी आभार मानले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, पद्म सन्मान समिती, राष्ट्रपती, पंतप्रधानांचे मी मनापासून आभार मानतो. याचबरोबर भारतातील जनतेचे आभार. आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मोठ्या व्यक्तींच्या गटात मला आता स्थान मिळाले आहे. मी आदरपूर्वक हा सन्मान स्वीकारत आहे.

यंदा तिघांनी नाकारला पद्म सन्मान

दरम्यान, पश्चिम बंगालचे (West Bengal) माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांच्यासह तीन जणांनी यावर्षी पद्म सन्मान नाकारला आहे. यात प्रसिद्ध तबलावादक पंडित अनिंद्य चटर्जी (Anindya Chatterjee) आणि ज्येष्ठ बंगाली गायिका संध्या मुखर्जी (Sandhya Mukherjee) यांचा समावेश आहे. पद्म पुरस्कार नाकारण्यात आल्याने मोदी सरकारवर नामुष्की ओढवली आहे. यात नेमकी चूक कुणाची अशी चर्चा आता सुरू झाली आहे. कारण पद्म पुरस्कार जाहीर करण्याआधी केंद्र सरकार संबंधित व्यक्तीला दूरध्वनी करून त्याची संमती घेते. त्या व्यक्तीने संमती दिल्यानंतरच हा पुरस्कार जाहीर होतो. त्यामुळे पद्म पुरस्कार नाकारण्याचे आतापर्यंत केवळ अपवाद घडले आहेत. यावर्षी तब्बल तीन व्यक्तींनी पद्म पुरस्कार नाकारल्याने सरकारची फजिती झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT