Bipin Rawat
Bipin Rawat Sarkarnama
देश

Breaking : सीडीएस बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला भीषण अपघात

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) प्रवास करत असलेल्या लष्करी हेलिकॉप्टरला तमिळनाडतील कुन्नूर येथे अपघात झाल्याचे वृत्त आहे. या हेलिकॉप्टरमध्ये रावत यांच्यासोबत अन्य 14 जण असल्याचे समजते. प्राथमिक माहितीनुसार, दोन जणांचा मृत्यू झाला असून तिघांना वाचवण्यात यश आलं आहे. रावत यांच्याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

या हेलिकॉप्टरमध्ये रावत यांच्या पत्नी मधुलिका व काही कुटुंबीय, अधिकारी प्रवास करत होते, अशी माहिती आहे. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर लगेच पेट घेतला. तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.

रावत यांच्याविषयीही अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. अपघातानंतर हेलिकॉप्टर जळून खाक झाले आहे. जवळच्या नागरिकांना तातडीने बचाव कार्य सुरू केले. त्यांनीच दोघांचे मृतदेह बाहेर काढल्याचे समतजे. लष्कराचे अधिकारी तिथे दाखल झाले असून बचावकार्याला वेग आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT