Ncp News :  Sharad Pawar News :
देश

Sharad Pawar News : ...नाहीतर दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका, सरकारने निर्णय मागे घ्यावा; पवारांचे मंत्र्यांना पत्र!

Ncp News : डेअरी क्षेत्राच्या विकासाला बाधा येईल..

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar News : केंद्र सरकारमधील पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने दुग्धजन्य पदार्थांची आयात करण्याचा निर्णय घेणार असल्याचे, चर्चा होती. केंद्र सरकारच्या या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहत, हा निर्णय मागे घेण्याबाबत सल्ला दिला आहे. अशा प्रकारच्या निर्णयामुळे देशांतर्गत दुग्ध व्यवसायावर विपरित परिणाम होईल, यामुळे हा निर्णय मागे घेण्यात यावा, असे शरद पवार (Sharad Pawar) यांनी सुचविले आहे.

शरद पवार म्हणाले, "आज एका वर्तमानपत्रात बातमी वाचली. या बातमीनुसार केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय दुग्धजन्य पदार्थांची आयात करण्याचा विचारात आहे, असे दिसून येते. "

पवार पुढे म्हणाले, "अशा प्रकारचा कोणताही निर्णय योग्य नसेल. कारण - या उत्पादनांच्या आयातीचा थेट देशांतर्गत दूध उत्पादकांच्या उत्पन्नावर याचा विपरित परिणाम होईल. दुग्ध उत्पादक शेतकरी अलीकडेच कोविड-19 सारख्या मोठ्यासंकटातून बाहेर आले आहेत आणि या निर्णयामुळे डेअरी क्षेत्राच्या पुनरुज्जीवन प्रक्रियेला मोठा अडथळा निर्माण होईल."

"या गोष्टीकडे विशेष लक्ष वेधण्यात यावे. या प्रकरणाकडे लक्ष देवून सरकारने दुग्धजन्य पदार्थ आयात करण्याचा निर्णय मागे घेतल्यास मला आनंद होईल," असे ही पवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT