MLA Ashish Das
MLA Ashish Das 
देश

भाजपला धक्का; मुंडण करत आमदाराचा पक्षाला रामराम

सरकारनामा ब्युरो

कोलकता : मागील काही महिन्यांपासून भाजपमधून बाहेर पडणाऱ्या आमदारांची रांग लागली आहे. पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) आतापर्यंत पाच आमदारांनी पक्ष सोडला आहे. इतर राज्यांतून काही आमदार पक्षातून बाहेर पडले आहे. मंगळवारी त्रिपुरातील (Tripura) एका आमदारानं मुंडण करत पक्षाला रामराम ठोकला. लवकरच ते तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

अनेक वर्ष भाजपसोबत (BJP) असलेले नेते व आमदार आशिष दास (Ashish Das) यांनी मंगळवारी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याची घोषणा केली. ते सुरमा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी मंगळवारी कोलकाता येथील प्रसिध्द कालिघाट मंदिरात जाऊन यज्ञ केला. तसेच तिथे मुंडणही केले. हे मंदिर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या घराजवळच आहे. पक्ष सोडताना दास यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

भाजपची सत्ता असलेल्या त्रिपुरामध्ये राजकीय अराजकता पसरली आहे. राज्य सरकारच्या कामगिरीवर लोक प्रचंड नाराज आहे. त्यामुळंच मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे दास यांनी सांगितले. त्यांनी काही महिन्यांपूर्वी ममता बॅनर्जी यांना भावी पंतप्रधानही म्हटले होते. तसेच मागील दोन वर्षांपासून ते त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांच्याविरोधात सातत्याने वक्तव्य करत आहेत.

त्रिपुरामध्ये 2023 मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी तृणमूल काँग्रेसकडून आतापासूनच जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर तृणमूलकडून काँग्रेस व भाजपच्या आमदारांना गळाला लावले जात आहे. दास हेही लवकरच तृणमूलमध्ये दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली आहेत. पण दास यांनी याबाबत अद्याप स्पष्ट केलेलं नाही. मी भाजप सोडत असून अद्याप पुढील निर्णय घेतलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.

दास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली आहे. 'ना खाऊंगा, ना खाणे दुंगा' हे मोदींचे वाक्य देशातील सर्व स्तरातील लोकांना भावले होते. पण आता देशात हा एक प्रसिध्द जुमला बनला आहे, असं दास म्हणाले. दास यांनी भवानीपूर पोटनिवडणुकीत ममतांचा विषय झाल्यानंतर त्यांचं कौतूक केलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT