MLAs from Jharkhand
MLAs from Jharkhand sarkarnama
देश

राजकारण तापले; मुख्यमंत्री आमदारांना घेऊन छत्तीसगडमध्ये जाणार

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : झारखंडमधील (Jharkhand) सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे आमदार 'फुटले' जाण्याची भीती सत्ताधारी पक्षाला वाटत आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस (Congress) आघाडीचे आमदार विमानतळावर पोहोचले आहेत. तेथून त्यांना छत्तीसगडमधील रायपूरला नेले जाण्याची शक्यता आहे.

झारखंड सध्या राजकीय संकटाच्या टप्प्यातून जात आहे. विरोधी पक्ष भाजपने (BJP) राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना एका प्रकरणात विधानसभेतून अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे. सोरेन यांच्या पक्षाने अशी भीती व्यक्त केली आहे की भाजप सध्याच्या संकटाचा फायदा घेऊन सरकार पाडण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे मंगळवारी दुपारी आमदार सोरेन यांच्या निवासस्थानातून दोन बसेसमधून रांची विमानतळाच्या दिशेने जाताना दिसले. सूत्रांनी असेही सांगितले की, आमदारांना रायपूरला नेण्यासाठी विमानदेखली बुक करण्यात आले आहे.

सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) - काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) आघाडी पुढील रणनीती बनवत आहे. 81 सदस्यीय विधानसभेत सत्ताधारी आघाडीचे 49 आमदार आहेत. सर्वात मोठा पक्ष जेएमएमकडे 30 आमदार, काँग्रेसचे 18 आमदार आणि तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाकडे (आरजेडी) एक आमदार आहे. प्रमुख विरोधी पक्ष भाजपकडे २६ आमदार आहेत.

मुख्यमंत्र्यांवरच अपात्रतेची टागती तलवार आहे. त्यामुळे झारखंडमधील राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री सोरेन अपत्रा ठरले तर पुढे काय असा प्रश्न सत्ताधारी आघाडीपुढे आहे. त्यामुळे अनेक आमदार मुख्यमंत्री पदाची आपेक्षा व्यक्त करु शकतात. त्या वादाचा फायदा विरोधी पक्ष भाजप उठवले ही भितीही आघाडीला आहे. त्यामुळे आमदारांना इतर राज्यामध्ये सुरक्षीत स्थळी हलवले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT