MLC Election 2026 Sarkarnama
देश

MLC Election : विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी भाजपमध्ये मोठी स्पर्धा, काँग्रेसमधून आलेल्या नेत्याला धक्का? बड्या कारखानदाराची तगडी फिल्डिंग!

BJP Satish Ghadge : विधान परिषदेची निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. या उमेदवारासाठी मराठवाड्यात मोठी भाजपमध्ये मोठी स्पर्धा असल्याचे दिसून येत आहे.

Jagdish Pansare

BJP News : विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या आणि इच्छुकांची धावपळ सुरू झाली. छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आमदार होण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि शिंदेंची शिवसेना या दोन्ही पक्षांकडे मोठी गर्दी आहे. 2018 मध्ये युतीमध्ये या मतदारसंघातून शिवसेनेचे अंबादास दानवे निवडून गेले होते.

दरम्यान, 6 वर्षात या मतदारसंघातील राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. भाजपाची ताकद या दोन्ही जिल्ह्यात वाढल्यामुळे त्यांची दावेदारीही वाढली आहे. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांना पक्षाकडून संधी दिली जाईल अशी दाट शक्यता वर्तवली जात असतानाच आता जिल्ह्यातील एका साखर कारखानदार नेत्याचे नाव समोर येऊ लागले आहे. वर्षभरापुर्वी भाजपामध्ये प्रवेश केलेले सतीश घाडगे पाटील हे विधान परिषदेवर जाण्यास इच्छूक आहेत.

घनसावंगी विधानसभेचे निवडणूक प्रमुख तथा समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन असलेल्या सतीश घाटगे पाटील यांना उमेदवारी द्या, अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी केली आहे. यासाठी मंगळवारी जालना जिल्ह्यातील भाजपचे प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी आमदार बबनराव लोणीकर यांची भेट घेतली.

छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सतीश घाटगे पाटील यांनी केलेले संघटनात्मक काम आणि त्यांची जनसामान्यांतील पकड लक्षात घेता, पक्षाने त्यांना यावेळी विधान परिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी या भेटीत करण्यात आली आहे.

लवकरच घनसावंगी विधानसभेतील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचीही भेट घेणार आहेत. सतीश घाटगे पाटील हे साखर कारखानादारीच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचे भाजपाच्या राज्यातील नेत्यांशी चांगले संबंध आहेत. भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांचे पक्षात राजकीय वजन वाढल्याचेही बोलले जाते.

भाजपच्या निर्णयाकडे लक्ष

सतीश घाटगे हे घनसावंगी तालुक्यातील समृद्धी साखर कारखाना आणि खुलताबाद तालुक्यातील घृष्णेश्वर शुगर्स लि. या दोन कारखान्याचे चेअरमन आहेत. घनसावंगी विधानसभा मतदारसंघात भाजपचा विस्तार आणि संघटनात्मक बांधणीसाठी त्यांनी मोठे काम केल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जातो. अंबड, घनसावंगी आणि जालना तालुक्यांसह परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यामध्ये ते परिचित असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे भाजपच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. भाजप धक्का तंत्र देत नवीन चेहरा देणार का? याची देखील चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT