PM Narendra Modi News, EPFO News, EPF news update
PM Narendra Modi News, EPFO News, EPF news update Sarkarnama
देश

मोदी सरकारचा नोकरदारांना दणका! पीएफवरील व्याजदर चार दशकांतील नीचांकी

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : मोदी सरकारने (Modi Government) देशातील नोकरदारांना आता दणका दिला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) वरील व्याजदर आर्थिक वर्ष 2021-22 साठी 8.5 टक्क्यांवरून 8.1 टक्के करण्यात आला आहे. केंद्रीय कामगार मंत्रालयाने याबाबतता प्रस्ताव पाठवला होता. याला केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. मागील 40 वर्षांतील हा नीचांकी व्याजदर ठरला आहे. (EPFO slashed interest rates)

व्याजरात घसरण होत असल्याने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने व्याजदरात कपात केली आहे. या व्याजदर कपातीमुळे संघटनेकडे चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस 450 कोटी रुपयांचा अतिरिक्त शिल्लक राहणार आहे. मागील वर्षी हा व्याजदर 8.5 टक्के होता. त्या तुलनेत यंदा अंदाजित उत्पन्न 76 हजार 768 कोटी रुपये असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (EPFO) देशभरात 5 कोटी सभासद आहेत. ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक मार्च महिन्यात आसाममधील गुवाहाटीत झाली होती. या बैठकीत व्याजदराबाबतचा निर्णय घेण्यात आला होतका. मंडळाने चालू आर्थिक वर्षासाठी 8.1 टकके व्याज देण्याचा निर्णय घेतला होता. मंडळाने हा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवला होता. अखेर याला मंजुरी मिळाली आहे. मागील आर्थिक वर्षात हा व्याजदर 8.5 टक्के होता. आता तो 40 वर्षांतील नीचांकी पातळीवर गेला आहे. याआधी 1977-78 मध्ये हा व्याजदर 8.1 टक्के होता.

अर्थ मंत्रालयाने मंडळाच्या निर्णयाला मंजुरी दिल्याने हा व्याजदर आता लागू होणार आहे. याबाबत ईपीएफओ आपल्या क्षेत्रीय कार्यालयांना याबाबत निर्देश देईल. यानंतर चालू आर्थिक वर्षासाठी कर्मचाऱ्यांना ईपीएफवर 8.1 टक्के व्याजदर लागू होईल. मार्च 2020 मध्ये ईपीएफओने आर्थिक वर्ष 2019-20 साठी व्याजदर 8.5 टक्क्यांवर आणला होता. तो सात वर्षांतील नीचांकी होता. त्याआधी 2012-13 मध्ये हा व्याजदर 8.5 टक्के होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT