New Delhi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत बुधवारी(ता.1 ऑक्टोबर) पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. मोदी सरकारने (Modi Government) देशातील डाळ उत्पादन वाढवण्यासाठी आणि आयातीवरील अवलंबत्व कमी करण्यासाठी 11000 कोटींच्या 6 वर्षांच्या योजनेला मंजुरी दिली आहे. तसेच रब्बी हंगामातील पिकांसाठी किमान आधारभूत दर निश्चित करण्यात आला असून,सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे.
केंद्र सरकारकडून रब्बी हंगाम 2026-27 साठी निवडक पिकांचा MSP जाहीर करण्यात आला आहे.याबाबत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली आहे. गहूचा MSP ₹2585 प्रति क्विंटल निश्चित करण्यात आला असून ज्वारीचा ₹2150, तर हरभरा ₹5875, मसूर ₹7000, सरसों/रेपसीड ₹6200 आणि सैफफ्लॉवर ₹6540 प्रति क्विंटल दर निश्चित करण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना थेट लाभ होणार आहे.
मोदी सरकारने बिहार विधानसभा निवडणूक आणि दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी (Farmers) मोठी घोषणा केली आहे. सरकारने रब्बी पिकांसाठी किमान एमएसपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.यासाठी 84,263 कोटींच्या पॅकेज जाहीर केले आहे.हे पॅकेज आगामी 6 वर्षांसाठी असणार आहे.तसेच मोदी सरकारकडून डाळ उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी 11,440 कोटी रुपयांचं मोठं पॅकेज मंजूर करण्यात आलं आहे.
केंद्र सरकार या योजनेअंतर्गत संशोधन,बीज व्यवस्था,शेती क्षेत्राचा विस्तार,खरेदी यंत्रणा आणि भाव स्थिरता यावर भर देणार आहे. डाळ उत्पादनासाठी तब्बल 35 लाख हेक्टर अतिरिक्त क्षेत्र नव्यानं तयार केले जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे भाताच्या परतीच्या जमिनींचा वापर या योजनेतंर्गत अधिक केला जाणार आहे.
या योजनेमुळे उच्च उत्पादन देणाऱ्या,कीड-प्रतिरोधक आणि हवामान सहनशील डाळींच्या जाती विकसित करून त्यांचा प्रसार करण्यास मदत होणार आहे. जे डाळ उत्पादक राज्ये आहेत,त्यात मल्टी-लोकेशनवर सराव घेत योग्य बीजांचा प्रसाराबाबत ठरवलं जाणार आहे.
दरवर्षी कृषी मूल्य आणि किंमत आयोगाकडून (CACP) पेरणीपूर्वी 22 पिकांसाठी एमएसपीची शिफारस केली जाते. यात 14 खरीप पिके आणि 7 रब्बी पिकांचा समावेश असतो. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात त्यावर शिक्कामोर्तब करण्यात येते.बळीराजाला आर्थिक दिलासा त्यातही रब्बी हंगामातील शेतपिकांना आधार देण्याच्या हेतून या पिकांच्या आधारभूत किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.