PM Kisan Yojana 2026 Sarkarnama
देश

Modi Government Scheme: फडणवीसांच्या कर्जमाफीच्या घोषणेनंतर मोदी सरकारचं शेतकर्‍यांना मोठं गिफ्ट; पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाची अपडेट

PM Kissan Yojana Update: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) ही मोदी सरकारची एक लोकप्रिय योजनांपैकी एक आहे. या योजनेद्वारे लाभार्थी शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी ₹2000च्या तीन समान हप्त्यांत थेट बँक खात्यात जमा होतात.

Deepak Kulkarni

New Delhi News: महाराष्ट्रातील महायुती सरकारने केलेल्या कर्जमाफीच्या घोषणा केली आहे. या घोषणेनंतर केंद्रातील मोदी सरकारनेही शेतकर्‍यांना मोठं गिफ्ट जाहीर केलं आहे. केंद्र सरकारच्या या घोषणेचा फायदा देशभरातील कोट्यवधी शेतकर्‍यांना होणार आहे.

मोदी सरकारने पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच देशातील शेतकर्‍यांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरलेली प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. शुक्रवारी(ता.31 जुलै) पीएम किसान योजनेला पुढील पाच वर्षांसाठी 2030-31 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे.

केंद्रातील मोदी सरकारनं पीएम किसान योजनेला मुदतवाढ देताना पुढील पाच वर्षांसाठी तब्बल 3.15 लाख कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सरकारने घेतलेल्या या निर्णयाबाबतची माहिती दिली आहे.

प्रधानमंत्री किसान सम्मान निधीचे आत्तापर्यंत एकूण 23 हप्ते पात्र शेतकऱ्यांना मिळाले आहेत. या योजनेचा 24 वा हप्ता शेतकऱ्यांना ऑक्टोबर महिन्यात मिळण्याची शक्यता आहे. आतापर्यंत या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तब्बल 4.47 लाख कोटी रुपये थेट जमा करण्यात आले आहेत.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) ही मोदी सरकारची एक लोकप्रिय योजनांपैकी एक आहे. या योजनेद्वारे लाभार्थी शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी ₹2000च्या तीन समान हप्त्यांत थेट बँक खात्यात जमा होतात. याबाबतची अधिकची माहितीस पीएम किसान अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT