नवी दिल्ली : जम्मू- काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) पंडित आणि अल्पसंख्याक हिंदू समुदायाला लक्ष्य करून दहशतवाद्यांकडून हल्ले होच आहेत. यामुळे खोऱ्यात दहशतीचे वातावरण आहे. यातच काश्मिरी पंडितांसह सरकारी कर्मचारी काश्मीर खोरे सोडून बाहेर पडत आहेत. सरकारनं त्यांना तेथून बाहेर पडण्यास मनाई केली आहे. काश्मीरमधील परिस्थिती हाताबाहेर चालल्याची भीती विरोधक व्यक्त करीत आहेत. यातच आता मोदी सरकारनं या बिघडलेल्या परिस्थितीसाठी पाकिस्तानकडं बोट दाखवलं आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल (Ajit Doval) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची सुरवातीला बैठक झाली होती. यानंतर शहांनी पुन्हा एकदा उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि लष्करप्रमुखांसह केंद्रीय गुप्तचर यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मीरमधील हिंसाचार वाढला असला तरी तो जिहाद नाही, असे गुप्तचर संस्थांनी स्पष्ट केले. काही ठराविक घटकांकडून हे हल्ले होत आहेत. या हिंसाचारामागील खरे सूत्रधार हे पाकिस्तानात बसले आहेत, असा दावाही गुप्तचरं संस्थांनी केला. काश्मीरमध्ये तालिबानी असल्याचा सध्या तरी कोणताही पुरावा नाही. मोदी सरकारने तालिबानशी चर्चा केल्याचा हा परिणाम आहे, असेही या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
नॉर्थ ब्लॉक येथे झालेल्या काल काश्मीरबाबत मॅरेथॉन बैठका झाल्या. या बैठकांत अमित शहांनी काश्मीर खोऱ्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक अरविंद कुमार, रिसर्च अँड अॅनालिसिस विंगचे प्रमुख सामंत गोयल आणि जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबागसिंग यांनी शहांना खोऱ्यातील परिस्थितीची माहिती दिली. मागील काही दिवसांत दहशतवाद्यांकडून हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे काश्मिरी पंडितांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काश्मीरमधील सुरक्षेचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. याचबरोबर अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला.
मागील 15 दिवसांत दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यांचा गृहमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. या हल्ल्यांमुळे काश्मीर खोऱ्यातील हिंदू दहशतीखाली आहेत. ते हे खोरे सोडून पलायन करत असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतही बैठकीत चर्चा झाली. दरम्यान, दहशतवाद्यांनी एका बँक व्यवस्थापकाची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना ताजी आहे. दहशवाद्यांनी 31 मे रोजी जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात कुलगाम येथे एका शिक्षिकेसह तिघांची हत्या केली होती. त्याआधी १८ मे रोजी उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला येथील दारूच्या दुकानावर ग्रेनेड फेकण्यात आले होते. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. पोलीस कॉन्स्टेबल सेफुला कादरी, टीव्ही कलाकार अमरीन भट्टचीही हत्या करण्यात आली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.