Vivek Banzal news Sarkarnama
देश

Modi Government : टॉवेल, अंतवस्त्रे, तेल आणण्यासाठीही सरकारी टीम, अधिकाऱ्याचा शाही दौरा वादात; शिंदे संतापले, कारवाई सुरू...

BSNL director controversy : वाहनांमध्ये पाण्याच्या बाटल्या, चौकलेट्स आणि खाद्यपदार्थ ठेवण्याचे नियोजन करण्यात आले होते. प्रवासादरम्यान कपड्यांची व्यवस्थाही करण्याचे नियोजित होते.

Rajanand More

Public sector controversy India : मंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दौरे म्हटले की संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा त्यांच्या दिमतीला असते. अशाच एका शाही दौऱ्याची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. अर्थात त्यावरून मोठा वाद निर्माण झाल्यानंतर दौरा रद्द झाला आहे. मोदी सरकारनेही तातडीने या दौऱ्याची दखल घेत कारवाई सुरू केली आहे. हा दौरा सध्या प्रशासनात चर्चेचा विषय ठरत आहे.

नेमकं काय घडलं?

भारत संचार निगम लिमिटेडचे (BSNL) संचालक विवेक बंझल यांचा प्रयागराज दौरा निश्चित झाला होता. त्यासाठी बीएसएनएल प्रशासनाकडून जंगी तयारी करण्यात आली होती. त्यामुळे हा दौरा शाही ठरल्याची चर्चा होती. दौऱ्याच्या नियोजनाची माहिती सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर सरकारी कर्मचारी आणि सुविधांचा कसा गैरवापर होतो, याची जोरदार चर्चा सुरू झाली.

विवेक बंझल यांच्यासह सरकारवरही टीका होऊ लागल्यानंतर दौरा रद्द करण्यात आला. मात्र, मोदी सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यावर सात दिवसांत स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही, असेही नोटिशीमध्ये बजावण्यात आल्याचे इंडिया टुडेच्या वृत्ता म्हटले आहे. नोटिशीला उत्तर आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

कसा होता दौरा?

बंझल यांच्या दौऱ्यासाठी उपमहासंचालकांकडून काढण्यात आलेला अधिकृत आदेशानुसार, दौऱ्यासाठी तब्बल ५० बीएसएनएल कमचाऱ्यांना दोन दिवस नियुक्त करण्यात आले होते. त्यांच्या प्रयागराजमध्ये २१ टीम तयार करण्यात आल्या होत्या. प्रत्येक टीमकडे स्वतंत्र जबाबदारी देण्यात आली होती.

बंझल यांचे रेल्वे स्थानकात आल्यानंतर स्वागत करणे, त्यांना प्रयागराज येथील मंदिराचा दौरा, बोट रायडिंग याची जबाबदारी कर्मचाऱ्यांवर टाकण्यात आली होते. एवढेच नाही तर प्रयागराज येथील संगमावर ‘स्नान’ करण्यासाठी कीट तयार करण्याचे आदेश देण्यात आले होते. या कीटमध्ये टॉवेल, अंतवस्त्रे, तेल, कंगवा आदींचाही समावेश होता.

कर्मचाऱ्यांना बंझल यांच्या दौऱ्यासाठी फोटोग्राफी, वाहनव्यवस्थाही करण्यास सांगण्यात आली होती. वाहनांमध्ये पाण्याच्या बाटल्या, चौकलेट्स आणि खाद्यपदार्थ ठेवण्याचे नियोजन करण्यात आले होते. प्रवासादरम्यान कपड्यांची व्यवस्थाही करण्याचे नियोजित होते. पण दौरा वादात अडकल्यानंतर रद्द करण्यात आला आहे. त्यानंतर केंद्र सरकारनेही आता कारवाई सुरू केली आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी याची गंभीर दखल घेत असे प्रकार सहन केले जाणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT