IAS Officer Reshuffle Sarkarnama
देश

Modi government IAS officer reshuffle : मोदी सरकारवर आणखी एक मोठी नामुष्की; 17 दिवसांतच करावी लागली बड्या अधिकाऱ्याची उचलबांगडी

Modi government IAS officer appointment latest news : मोदी सरकारमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल झाला आहे. जाणून घ्या सविस्तर

Rashmi Mane

IAS Deepti Gaud Mukherjee new appointment : केंद्र सरकारने सोमवारी रात्री वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या आणि नियुक्त्या जाहीर केल्या. या प्रशासकीय फेरबदलात वरिष्ठ IAS अधिकारी दीप्ती गौड मुखर्जी यांची उच्च शिक्षण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे केंद्रीय उच्च शिक्षण विभागाची महत्त्वाची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर आली आहे. शिक्षण क्षेत्राशी संबंधित महत्त्वाचे निर्णय आणि धोरणांच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.

कार्मिक मंत्रालयाने सोमवारी रात्री जारी केलेल्या आदेशानुसार, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने दीप्ती गौड मुखर्जी यांना नवीन उच्च शिक्षण सचिव म्हणून नियुक्त करण्यास मंजुरी दिली. NEET पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्र सरकारने मोठा प्रशासकीय फेरबदल करत उच्च शिक्षण सचिव विनीत जोशी यांची या पदावरून बदली केली होती.

विशेष म्हणजे, यापूर्वी 23 जूलैला पशुपालन आणि दुग्धव्यवसाय विभागाचे सचिव नरेश पाल गंगवार यांची उच्च शिक्षण सचिव म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता केंद्र सरकारने प्रशासकीय पातळीवर फेरबदल करत दीप्ती गौड मुखर्जी यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली.

नीट पेपर लीक प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दीप्ती गौड मुखर्जी यांची उच्च शिक्षण सचिवपदी झालेली नियुक्ती विशेष महत्त्वाची मानली जात आहे. देशातील उच्च शिक्षण व्यवस्था, परीक्षा प्रक्रिया आणि शैक्षणिक धोरणांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर केंद्र सरकारकडून निर्णय घेतले जात आहेत.

केंद्र सरकारच्या या मोठ्या IAS फेरबदलामुळे अनेक महत्त्वाच्या केंद्रीय विभागांच्या प्रशासकीय नेतृत्वात बदल झाला असून, उच्च शिक्षण विभागातील दीप्ती गौड मुखर्जी यांची नियुक्ती सध्या विशेष चर्चेचा विषय ठरली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT