Winter Session 2026 : लोकसभा मतदारसंघांच्या फेररचनेबाबत घटनादुरूस्ती विधेयकासाठी संसदेचे विशेष अधिवेशन घेण्यासंदर्भात केंद्रातील भाजप मोदी सरकारने संदिग्धता कायम ठेवली असतानाच, आता हिवाळी अधिवेशन रद्द करून थेट अर्थसंकल्पीय अधिवेशन घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
केंद्रातील भाजप मोदी सरकारच्या या हालचालींवर इंडिया आघाडी सावधगिरी बाळगून असली, तरी विशेष करून काँग्रेसने अधिकच सावधानता बाळगून आहे. त्यामुळे केंद्रातील भाजप मोदी सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशन घेण्याबाबतच्या चर्चांना तोंड फुटले आहे.
काँग्रेसचे (Congress) खासदार जयराम रमेश यांनी याबाबत असा दावा केला आहे की, "हिवाळी अधिवेशन रद्द करून थेट अर्थसंकल्पीय अधिवेशन घेण्याची केंद्रातील भाजप मोदी सरकारची शक्यता आहे. कारण, घटनेनुसार संसदेचे अधिवेशन किमान दर सहा महिन्यांनी होणे बंधनकारक आहे. त्यामुळे सरकार हिवाळी अधिवेशन रद्द करण्याची घोषणा करू शकते."
हिवाळी अधिवेशन रद्द करून थेट अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दावा करताना, 19 नोव्हेंबर रोजी FICCIच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी (Modi Government) केलेल्या भाषणावेळची त्यांची देहबोली पाहता, ते प्रचंड अस्वस्थ, गोंधळलेले, चिंताग्रस्त आणि निराश असल्याचे स्पष्टपणे दिसत होते, याचा संदर्भ खासदार जयराम रमेश यांनी दिला आहे.
संसदेचे अधिवेशन बोलावले गेले, तर त्यात एकच प्रमुख मुद्दा उपस्थित होईल, याची त्यांना जाणीव आहे. तो प्रमुख मुद्दा म्हणजे म्हणजे, मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा! या मुद्यावर केंद्रातील भाजप मोदी सरकारला चर्चा नको आहे. त्यामुळे थेट अर्थसंकल्पीय अधिवेशन होऊ शकते, असा अंदाज खासदार जयराम रमेश यांनी व्यक्त केला आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याच कारणामुळे सरकार संसदेपासून पळ काढत आहे. अधिवेशन बोलावले, तर प्रत्येक राजकीय पक्ष मुख्य निवडणूक आयुक्तांचा मुद्दा उपस्थित करेल आणि सरकारकडे त्यावर कोणतेही उत्तर नाही, याची त्यांना जाणीव आहे, त्यामुळेच हा खटाटोप आहे, असेही खासदार जयराम रमेश यांनी म्हटले.
दरम्यान, लोकसभा मतदारसंघांच्या फेररचनेबाबत घटनादुरूस्ती विधेयकाबाबत, केंद्रातील भाजप मोदी सरकारकडून संख्याबळाची चांगलीच जुळवाजुळव सुरू आहे. इंडिया आघाडीपासून लांब गेलेल्या 'द्रमुक'ने सकारात्मक प्रतिसाद देण्यास सुरूवात केली आहे. 'द्रमुक' पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने अनुकूलता दर्शवत आहे.
भाजप मोदी सरकारने, लोकसभा मतदारसंघांच्या फेररचनेबाबत घटनादुरूस्ती विधेयकावर संख्याबळ जुळवाजुळव करतानाच, अर्थसंकल्पीय अधिवेशन घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येताच, विरोधक इंडिया आघाडीतील घटकपक्ष सावध झाले आहे. भाजपची ही राजकीय खेळी संसदेच्या पुढच्या अधिवेशनात यशस्वी झाल्यास, तो मोदींचा मास्टरस्ट्रोक देखील ठरू शकतो. हे ओळखून काँग्रेसने आपल्या खासदारांना पुढील दहा ते बारा दिवस साधव राहाण्याच्या सूचना देत, दिल्ली बोलवणे आल्यास तत्काळ रवाना होता येईल, असे कार्यक्रम आखण्याच्या सूचना दिल्या आहेत.
केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या या राजकीय हालचालीमुळे दिल्लीतील थंड वातावरणात देखील राजकीय घमासान सुरू झाल्याचे दिसते आहे. यावर्षीचे दिल्लीतील संसदेचे अधिवेशन ऐतिहासिका ठरू शकते, असे राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. सत्ताधारी भाजपबरोबर काँग्रेस देखील आक्रमक भूमिकेत आहेत. केंद्रातील सरकारच्या माहिती आपल्यापर्यंत येत असल्याचे सांगून, राहुल गांधींनी देखील सत्ताधारी भाजपचे टेन्शन वाढवले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.