ranjan gagoi
ranjan gagoi 
देश

राममंदिराच्या बाजूने निकाल दिलेल्या सरन्यायाधीश गगोईंना मोदींनी राज्यसभेवर घेतले

सरकारनामा ब्यूरो

पुणे : रामजन्मभूमी वादावर निकाल देणारे माजी सरन्यायाधीर रंजन गंगोई यांची राज्यसभेवर राष्ट्रपकी नियुक्त सदस्य म्हणून आज घोषणा करण्यात आली. सरन्यायाधीशांनी राज्यसभेवर येण्याची ही पहिलीच घटना आहे.

एका राजपत्राद्वारे गगोई यांच्या नावाची घोषणा आज सायंकाळी उशिरा झाली. गगोई यांनी तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेणाऱ्या न्यायाधीशांत समावेश होता. तसेच त्यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप झाला होता. राफेलप्रकरणी त्यांनी निकाल दिला होता. त्यात त्यांनी सरकारला क्लिन चीट दिली होती.

सरन्यायाधीश शक्यतो सत्तेचे पद घेत नाही, असा संकेत आहे. या आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना क्लिनचीट देणारे सरन्यायाधीश पी. सदाशिवम यांना केरळचे राज्यपाल म्हणून नेमले होता. आता गगोई यांना खासदार म्हणून संधी मिळाली आहे.  गगोई यांचे वडिल हे आसामचे माजी मुख्यमंत्री होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT