Supriya Sule - PM Modi Sarkarnama
देश

NCP On Modi LokSabha Speech: मोदींच्या भाषणावर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया; सुळे म्हणाल्या, "दीड तासांच्या भाषणात ते फक्त ‘इंडिया’वर...

सरकारनामा ब्यूरो

New Delhi News: मणिपूर हिंसेचे विरोधक राजकारण करीत असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत काँग्रेसवर तुटून पडले. मोदींनी विरोधी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांच्या भाषणावर आता विरोधकांकडूनही टीका करण्यास सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. त्या एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, मोदींचे भाषण ऐकण्यासाठी आम्हाला उत्सुकता होती. त्यांनी देशातील अर्थव्यवस्था, गरिबी, महागाई, बेरोजगारी यावर बोलावं, अशी अपेक्षा होती. त्यांनी मणिपूर आणि त्याठिकाणी महिलांवर झालेल्या अत्याचारावर बोलावं, अशी आमची इच्छा होती. पण त्यांनी केलेल्या दीड तासांच्या भाषणात 90 टक्के ते फक्त ‘इंडिया’वर बोलले, अशी सडकून टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

विरोधी आघाडी INDIAच्या अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना मोदींनी काल (गुरुवारी) सांयकाळी ५:०९ मिनिटांनी बोलण्यास सुरुवात केली. भाषणात त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. सायंकाळी ६.४० वाजता विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर मोदींचे भाषण सुरू होते. मोदींच्या उत्तरानंतर आवाजी मतदानाने प्रस्ताव फेटाळला गेला.

'INDIA'वर काय म्हणाले मोदी..

मोदींनी भाषणात विरोधकांच्या 'INDIA'वर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, "विरोधकांना तग धरण्यासाठी NDA चा टेकू घ्यावा लागला.परंतु अहंकार एवढा की NDA मध्येही ‘I’ टाकला. पहिला ‘I’ २६ पक्षांच्या अहंकाराचा व दुसरा ‘I’ एका घराण्याचा अहंकार. शिवाय I.N.D.I.A मध्येही पूर्णविराम टाकून INDIA चे तुकडे पाडले, ही INDIA आघाडी नव्हे तर ‘घमंडिया’ आघाडी आहे. या वरातीत प्रत्येक जणाला ‘नवरा’, प्रत्येकाला ‘पीएम ’ व्हायचे आहे,"

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT