Bangladesh News : बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस आणि बांगलादेश लष्काराचे प्रमुख वाकर-उज-जमान यांच्यातील तणाव समोर आला आहे. ज्यावरून बांगलादेशातील परिस्थिती अधिकच बिघडताना दिसत आहे. लष्करप्रमुखांनी तातडीचे बैठक बोलावून या मुद्य्यावर चर्चा करण्याचे संकेत दिले आहे, ज्यामध्ये प्रमुख मुद्दा युनूस यांच्या नेतृत्वात सरकारद्वारे निवडणुकांमध्ये विलंब आणि परदेशांच्या संभाव्य हस्तक्षेपाचा आहे. लष्करातील सुत्रांच्या माहितीनुसार, लष्करप्रमुखांचे मत आहे की, युनूस हे परदेशी ताकदींच्या प्रभावात आहे आणि हेच कारण आहे की देशात अस्थिरतेची परिस्थिती निर्माण होवू शकते.
याशिवाय लष्कराकडून उपस्थित केला जात असलेला प्रमुख मुद्दा म्हणजे युनूस यांच्याकडून कैद्यांना कार्यकारी आदेशांतर्गत मुक्त केलं जाणं हा आहे. याव्यतिरिक्त बांगलादेश लष्करास ही देखील भीती आहे की, युनूस यांच्याकडून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या नियुक्तीने सैन्यात विभाजन होवू शकते. कारण, हे पाऊल लष्कर प्रमुखांच्या सहमतीशिवाय उचललं गेलं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार, हे पाऊल सैन्यात उच्च पदस्थ अधिकाऱ्यांमधील असहमती अधिक वाढवू शकतं, जे युनूस यांच्या विरोधात आहेत आणि लवकरात लवकर निवडणूक झाली पाहिजे या बाजूने आहेत.
लष्कर प्रमुख वाकर-उज-जमान यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, ते कोणत्याही प्रकारच्या नागरी दबावात येणार नाहीत आणि त्यांनी आपल्या कार्यालय व घराकडे होणारे निदर्शने थांबवली आहेत. सुरुवतीस ते युनूस यांच्यासोबत सहकार्य करू इच्छित होते, परंतु आता ते निवडणूक लवकरात लवकर घेण्याच्या बाजूने आहेत, जेणेकरून लोकशाही बहाल होवू शकेल. एवढंच नाहीतर लष्कर प्रमुखांनी सर्वच राजकीय पक्षांना निवडणुकीत सहभागी होण्याचे आवाहनही केले आहे, जेणेकरून स्थिरता कायम करता येईल.
बांगलादेश लष्करात अंतर्गत मतभेद वाढत आहेत. लष्कर प्रमुख वाकर-उज-जमान भारतीय समर्थक आणि संतुलित नेता म्हणून बघता येवू शकतं, तर क्वार्टरमास्टर जनरल लेफ्टनंट जनरल फईजुर रहमान यांना पाकिस्तान समर्थक आणि इस्लामिस्ट विचारधारचे समर्थक मानलं जातं, जे त्यांना लष्कर प्रमुखांपासून वेगळं करतं. हे अंतर्गत मतभेद आतापर्यंत अनेकदा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण करण्यास कारणीभूत ठरले आहेत.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.