Mohan Bhagawat
Mohan Bhagawat Sarkarnama
देश

Mohan Bhagawat : 'नरेंद्र मोदी आमचे स्वयंसेवक, मात्र त्यांच्यावर संघाचा दबाव नाही!'

सरकारनामा ब्युुरो

जबलपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत एक विधान केले आहे. नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक नक्कीच आहेत. मात्र ते स्वतंत्रपणे काम करणारे आहेत. स्वतंत्रपणे काम करणाऱ्या व्य़क्ती आणि संघटनांवर संघाचे नियंत्रण कधीच नसते. संघ अशा पद्धतीने कोणावर नियंत्रण ठेवत नाही, असे भागवत यांनी म्हंटले आहे.

जबलपूर येथे काही प्रतिष्ठीत नागरिकांच्या झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी ते वक्तव्य केले आहे. जेव्हा केव्हाही संघाचा उल्लेख केला जातो, तेव्हा लोकांपुढे मोदीजींचं नाव पुढे येतं. नरेंद्र मोदी हे संघाचे स्वयंसेवक आहेतच. कोणी संघाबद्दल उल्लेख केला तर आणखी काही लोकांना विश्व हिंदू परिषद आठवतं, त्याही संघटनेत स्वयंसेवक आहेत. आमची आणि त्यांची विचारसरणीचा धागा समान आहे, मात्र ते म्हणजे संघ नाहीत. ते त्यांच्या पातळीवर स्वतंत्रपणे कार्य करतात, असे भागवत यांनी स्पष्ट केले.

अशा व्यक्ती आणि संघटनांसाठी संघ वेळोवेळी मदत आणि सहकार्य करत असला तरी, यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कोणताही दबाव नसतो. यांच्याबाबत संघ कोणताही प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष हस्तक्षेप करत नाही, असेहा भागवत यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT