Mojtaba Khamenei video Sarkarnama
देश

Mojtaba Khamenei video : इराणी सुप्रीम लीडरच्या 12 सेंकदाच्या व्हिडिओने उडविली ट्रम्प, नेतन्याहू यांची झोप; इस्त्रायली सैनिकांच्या सुट्ट्या रद्द

Iran Supreme Leader, Iran health news : अयातुल्ला मोजतबा खामेनेई यांच्याकडे सर्वोच्च पद आल्यापासून ते एकदाही सार्वजनिक व्यासपीठावर आलेले नाहीत.

Rajanand More

Mojtaba Khamenei health : इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला मोजतबा खामेनेई यांचा एक व्हिडिओ पहिल्यांदाच समोर आला आहे. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीबाबत चर्चांना उधाण आले होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर त्यांचा खात्मा करण्याची भाषा केली होती. तर इस्त्रायलकडून खामेनेई हे गंभीर आजारी असल्याचे सांगितले जात होते. या चर्चा सुरू असतानाच खामेनेई यांचा १२ सेकंदाचा व्हिडिओ समोर आला आहे.

इराणची सरकारी एजन्सी असलेल्या मेहर न्यूजकडून खामेनेई यांचा हा व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ते धार्मिक बाबींवर उपस्थितांशी संवाद साधत असल्याचा दावा करण्यात आला आहे. खामेनेई यांचा युध्दाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंतचा हा पहिला व्हिडिओ समोर आला आहे.

दरम्यान, मेहर न्यूजकडून हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यावरून आता चर्चांना उधाण आले आहे. खामेनेई यांची प्रकृती ठणठणीत असल्याचा हा पुरावा असू शकत नाही, असा दावा आता सोशल मीडियातून होऊ लागला आहे. असे असले तरी हा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे इस्त्रायल आणि अमेरिकेचीही धडधड वाढली असून नेमके खरे काय, याबाबत संभ्रम वाढला आहे.

अयातुल्ला मोजतबा खामेनेई यांच्याकडे सर्वोच्च पद आल्यापासून ते एकदाही सार्वजनिक व्यासपीठावर आलेले नाही. इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियन यांनाही खामेनेई यांच्याशी थेट संवाद साधणे, खूप कठीण असल्याचे विधान नुकतेच केले होते. त्यामुळे खामेनेई यांच्या प्रकृतीबाबत चर्चांना उधाण आले होते. त्यांचा व्हिडिओ समोर आला असला तरी तो नेमका कधीचा आणि कुठला आहे, याबाबत इराणकडून माहिती देण्यात आलेली नाही.

सैनिकांच्या सुट्ट्या रद्द

दुसरीकडे इस्त्रायलकडून लष्करातील सर्व जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे इस्त्रायलकडून पुन्हा इराणवर जोरदार हल्ला चढविला जाणार, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. अमेरिकेकडून इराणसोबतच्या युध्दाला सध्या विराम दिला आहे. त्यावरून इस्त्रायल आणि अमेरिकेमध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा आहेत. अमेरिका आता आपल्या अटींवर युद्ध पुढे नेण्यास उत्सुक नसल्याची इस्त्रायलची भावना झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सैनिकांच्या सुट्ट्या रद्द करण्यावरून पुन्हा युध्दाचा भडका उडणार असल्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT