Parliament Sarkarnama
देश

Monsoon Session 2023 : नव्या अन् जुन्या दोन्ही संसदेत होणार पावसाळी अधिवेशन; असे असणार नियोजन ?

News Parliament : आक्रमक विरोधकांमुळे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता

सरकारनामा ब्यूरो

Monsoon Session 2023 And New Parliament : संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलैपासून सुरू होणार आहे. हे अधिकवेशन ११ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. याबाबत संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शनिवारी (ता. १ जुलै) माहिती दिली. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी पंतप्रधान मोदी सरकारवर टीकेची राळ उठवली आहे. त्यामुळे हे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. (Latest Political News)

या अधिवेशनाबाबत प्रल्हाद जोशी यांनी ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, "संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलै रोज सुरू होईल. हे अधिवेशन ११ ऑगस्टपर्यंत चालेल. या २३ दिवसांच्या अधिवेशनात एकूण १७ बैठका होणार आहेत. मी सर्व पक्षांना आवाहन करतो की अधिवेशन काळात विधीमंडळ आणि संसदेच्या इतर कामात विधायक योगदान द्यावे."

संसदेचे पावसाळी अधिवेशन गदारोळाचे होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समान नागरी संहितेचा पुरस्कार केल्यानंतर काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या मुद्द्यावरून संसदेतही गदारोळ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हे अधिवेशनाची सुरुवात २० जुलै रोजी जुन्या संसद भवनात होणार आहे. त्यानंतर नव्या संसद भवनात बैठक होण्यार असल्याची माहिती आहे.

आगामी अधिवेशनात, केंद्र सरकार 'गव्हर्नमेंट ऑफ द नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली (सुधारणा) अध्यादेश' बदलण्यासाठी विधेयक आणू शकते. हे विधेयक सेवा प्रकरणांमध्ये दिल्ली सरकारला कायदेशीर आणि प्रशासकीय नियंत्रण देणारा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करेल. याशिवाय, सरकार नॅशनल रिसर्च फाउंडेशन (एनआरएफ) विधेयक २०१३ संसदेत सादर करू शकते. यामुळे 'एनआरएफ'ची स्थापना करण्याचा मार्ग मोकळा होईल.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT