Ministry of Information and Broadcasting:  Sarkarnama
देश

150 Youtube Channels and Websites Banned: केंद्र सरकारकडून 150 हून अधिक चॅनेल्स आणि वेबसाईट्स बॅन; कारण भारतविरोधी मजकूर...

Ministry of Information and Broadcasting: माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हे चॅनेल आणि वेबसाइट्स गेल्या 2 वर्षांपासून भारतविरोधी मजकूर सादर करत होते

सरकारनामा ब्यूरो

Ministry of Information and Broadcasting: माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 150 हून अधिक वेबसाइट्स आणि युट्युब आधारित न्यूज चॅनेलवर बंदी घालण्यात आली आहे. गेल्या 2 वर्षांपासून या प्लॅटफॉर्मवर भारतविरोधी मजकूर सादर केला जात असल्याने असे करण्यात आले आहे.माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याच्या कलम 69A चे उल्लंघन केल्यामुळे या वेबसाइट्स आणि चॅनेल काढून टाकण्यात आल्याचे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अधिकाऱ्याने सांगितले.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'भारतविरोधी' मजकूर प्रदर्शित केल्याप्रकरणी गेल्या 2 वर्षांत 150 हून अधिक वेबसाइट आणि यूट्यूब आधारित न्यूज चॅनेल काढून टाकण्यात आले आहेत. या युट्यूब चॅनेल्सचे 12.1 दशलक्ष पेक्षा जास्त सदस्य आहेत आणि एकूण 1324.26 दशलक्ष पेक्षा जास्त दृश्ये आहेत. हटवण्यात आलेल्या चॅनेलमध्ये खबर विथ फॅक्ट्स, खबर ताईज, इन्फॉर्मेशन हब, फ्लॅश नाऊ, मेरा पाकिस्तान, हकीकत की दुनिया आणि अपनी दुनिया यांसारख्या युट्यूब चॅनेल्सचा समावेश आहे. (National News)

भारताच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण करणाऱ्या खोट्या बातम्या आणि मजकूर सादर करू नये, यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालय वेळोवेळी अनेक यूट्यूब चॅनेल्सना ताकीद दिली आहे. त्यामुळे मंत्रालयाने अशा चॅनेल्सवर बंदी घातली आहेत. गेल्या वर्षीही भारतविरोधी मजकूर सादर करणारे चॅनेल आणि यूट्यूब लिंक्स ब्लॉक करण्यात आल्या आहेत. जर कोणी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांची दिशाभूल करणारे काही मजकूर पोस्ट करत असतील, प्रदर्शित करत असतील तरत्याला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराच प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिला होता. (National Politics)

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT