नवी दिल्ली : शिवसंग्रामचे नेते आणि विधान परिषदेचे माजी आमदार विनायक मेटे यांच्या गाडीला १४ ऑगस्ट २०२२ रोजी अपघात झाला होता. या अपघातात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच आता अशाप्रकारे झालेल्या अपघाताची आणखी एक घटना समोर आली आहे. (Uttar Pradesh Accident news)
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे ओएसडी मोतीलाल सिंह यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. बस्ती जिल्ह्यातील मुंडेरवा पोलिस स्टेशन हद्दीतील खजौला येथे हा अपघात झाला. नीलगाय वाचवण्याच्या नादात हा अपघात झाला. भरधाव वेगाने जाणारी स्कॉर्पिओ कार नियंत्रणाबाहेर गेल्याने झाडाला आदळली. या स्कॉर्पिओमध्ये मोतीलाल सिंह आणि त्यांच्या पत्नी होत्या हे त्यांच्या पत्नी आणि चालक होते.
ओएसडी मोतीलाल सिंह काही कामानिमित्त लखनऊला निघाले होते. या अपघातात ओएसडी मोतीलाल सिंह यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या पत्नी आणि चालक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना गोरखपूर मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मोतीलाल सिंह यांच्या पत्नीची प्रकृती चिंताजनक आहे.
गोरखपूरमधील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कॅम्प ऑफिसमध्ये नियुक्त सार्वजनिक सामान्य निवारण अधिकारी / OSD मोतीलाल सिंह यांचा कार्यकाळ 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आला. गोरखपूर महापालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्तपदावरून निवृत्त झाल्यानंतर मोतीलाल सिंह गोरखनाथ मंदिरात जाऊन लोकांच्या समस्या ऐकत असत.
गोरखपूरहून ते बस्ती जिल्ह्यातील मुंडेरवा येथे असलेल्या एनएचवर पोहोचले होते, तेव्हा एक प्राणी रस्त्यावर आला, वाचवण्याच्या प्रक्रियेत त्यांची कार झाडावर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की स्कॉर्पिओचा चक्काचूर झाला आणि मोतीलाल सिंग यांचा जागीच मृत्यू झाला. पत्नी आणि चालक गंभीर जखमी झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.