MP BJP Candidates List Sarkarnama
देश

MP BJP Candidates List: मध्य प्रदेशात तीन केंद्रीय मंत्र्यांसह सात खासदार विधानसभेच्या रिंगणात; भाजपकडून दुसरी यादी जाहीर

Mangesh Mahale

New Delhi : आगामी विधानसभेसाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. मध्य प्रदेशासाठी भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यात सात खासदारांना भाजपने विधानसभेच्या रिंगणात उतवरलं आहे. त्यात तीन केंद्रीय मंत्री आहेत.

दुसऱ्या यादीवरून लक्षात येते की, भाजपने उमेदवारी देताना गंभीरपणे विचार केलेला दिसतो. कारण लोकसभा निवडणुका सहा महिन्यांवर आहेत, सात खासदार विधानसभा जिंकले तरी या ठिकाणी पोटनिवडणूक होण्याची शक्यता नाही. मध्य प्रदेशच्या निवडणुका सामूहिक नेतृत्वात लढणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या जातील, असे भाजपकडून जाहीरपणे सांगितले जात नाही, पण कमलनाथांचा कार्यकाळ सोडला तर जवळपास दोन दशकं मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान हेच मुख्यमंत्री आहेत. त्यांना मानणारा मोठा जनसमुदाय आहे. पण अंतगर्त वादामुळे विधानसभा निवडणुका या सामूहिक नेतृत्वात लढण्यात येणार असल्याने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण हे भाजपकडून अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

या यादीमध्ये नरेंद्रसिंह तोमर, कैलाश विजयवर्गीय, रीती पाठक, प्रल्हाद पटेल या मोठ्या नावांचादेखील समावेश आहे. काल (सोमवारी) पंतप्रधान मोदी यांनी भोपाळचा दौराही केला होता. संध्याकाळी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

भाजपने जबलपूर पश्चिममधून राकेशसिंह, गदरवारामधून खासदार उदय प्रतापसिंह, मुरेनाच्या दिमानी मतदारसंघातून नरेंद्रसिंह तोमर, सतनामधून गणेशसिंह, नरसिंगपूरमधून प्रल्हाद पटेल यांना विधानसभेची तिकिटे देण्यात आली आहेत. राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांना इंदूरमधून विधानसभा उमेदवारी दिली आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT