Navneet Rana and Ravi Rana Marathi News
Navneet Rana and Ravi Rana Marathi News Sarkarnama
देश

आता राणा बीकेसीच्या मैदानावर हनुमान चालिसा म्हणणार : उद्धव ठाकरेंना पुन्हा आव्हान

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली: एका खासदाराने काल तुमच्या हातात संकटनिवारण हनुमानाची गदा दिली. तुम्ही त्या गदेला अस्पृश्य वागणूक दिली. हनुमानातचा, आपल्या संस्कृतीचा अपमान केलात. आता ज्या मैदानावर उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) हनुमानजींचा अपमान केला, येत्या काळात तिथेच हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पाठ करू, असे आणखी एक खुले आव्हान अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि अपक्ष आमदार रवि राणा (Ravi Rana) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले.

काल मुंबईतील बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री आणि शिवसेना (Shivsena) प्रमुख उद्धव ठाकरे यांची मास्टर सभा पार पडली. शिवसंपर्क अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत कोरोना काळ संपल्यानंतरची ठाकरे यांची ही पहिलीच जाहीर सभा होती. यात त्यांनी विरोधी पक्ष भाजप, भाजपचे नेते आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, मनसे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना निशाणा साधला. तसेच शिवसैनिकांना संबोधित करत मुंबई महापालिकेच्या प्रचाराचा नारळ देखील फोडला.

याच सभेवरुन खासदार राणा यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, 'काही वर्षांपूर्वीपर्यंत शिवसेना भाजपसोबत होती, मग शिवसेना दाऊद आहे का? पाठीत खंजीर खुपसणे ही शिवसेनेची सवय आहे.' औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहणाऱ्यांवर एकही टिप्पणी केली नाही. उद्धव ठाकरे औरंगजेबाच्या मार्गावर चालले आहेत का? शिवसेना औरंगजेबांची सेना झाली आहे का?' असाही प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर राणा यांनी टिकास्त्र सोडले.

उद्धव ठाकरे लाचार मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे हे लाचार मुख्यमंत्री आहेत. काल महाराष्ट्राच्या असहाय मुख्यमंत्र्यांची लाचार सभा झाली. ना शेती, ना बेरोजगारी, आणि लोडशेडिंगवर कोणतेही भाष्य नाही. ते स्वत: अडीच वर्षे मुख्यमंत्री कार्यालयात गेले नाहीत. त्यांचा मुलगा म्हणाला, मुख्यमंत्री विदर्भ आणि मराठवाड्यात गेले. विदर्भातील कोणत्या भागात आलेत त्याचा व्हिडिओ त्यांना प्रसिद्ध करावा. शेतकऱ्यांच्या दुरवस्थेवर एक शब्दही ते बोलले नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस सरकारच्या तुलनेत बेरोजगारी तीन पटीने वाढली आहे,'असेही राणा म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT