sanjay raut, Raosaheb Danve
sanjay raut, Raosaheb Danve sarkarnama
देश

दुर्बिणीने दानवे काय काय बघतात ते पहावं लागेल ; राऊतांचे सडेतोड उत्तर

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भाजपचे नेते केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve)यांनी शिवसैनिकांवर नुकतीच टीका केली होती. त्याला शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (sanjay raut)यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राऊत माध्यमांशी बोलत होते.

"बाबरी पाडली गेली, त्यावेळी दुर्बिणीने शोधून देखील शिवसैनिक सापडला नाही," असं रावसाहेब दानवे शिवसेनेवर टीका करताना काही दिवसापूर्वी म्हणाले होते. दानवे यांच्या या विधानाला राऊतांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

"अच्छा!दुर्बिणीने ते काय काय बघतात पहावं लागेल.त्यांच्याकडे दुर्बिणीनी लावल्या म्हणूनच ते बाबरी पडत असताना पळून गेले आणि शिवसैनिकांनी पाडली, असं सत्य कथन भाजप नेत्यांच्या तोंडून बाहेर पडलं.पळपुट्ट्यांनी आमच्याकडे दुर्बिणी लावू नये," असा इशारा राऊतांनी दानवेंना यावेळी दिला.

हार्दिक पटेल यांनी आज गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावर राऊत यांना विचारले असता ते म्हणाले, "हार्दिक पटेलनं आपल्या स्वतःच्या भूमिका तपासायला हव्यात. देशद्रोही या शब्दाची व्याख्या ही त्यांच्याविषयी केली होती, भारतीय जनता पक्षानं. असे अनेक मासे त्यांच्या गळाला लागत असतात. खोट्या केसेस, सत्तेचा गैरवापर त्याच्या माध्यमातून दबाव आणले जातात. हार्दिक पटेलसुद्धा त्याच एका यंत्रणेचा बळी आहे,"

काश्मिरातील पंडितांच्या हत्या आणि गुजरातमधील हार्दिक पटेल यांच्या पक्षांतराच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारला लक्ष्य केलं. पंतप्रधान,गृहमंत्री फक्त राजकारण करत आहेत, हेच देशातील हिंदूंचं दुर्दैव आहे, असं विधान राऊतांनी केलं.

राऊत म्हणाले, "नोटबंदीनंतर कश्मिरातील दहशतवाद संपुर्णपणे संपेल, असं वचन देणार सरकार आज कश्मीरमध्ये जवान, पोलीस अधिकारी, कश्मिरी पंडित, मुस्लीम अधिकारी मारले जाताहेत त्यांचं रक्षण करू शकत नाही. कारण पंतप्रधान, गृहमंत्री फक्त निवडणुका आणि राजकारण यामध्ये गुंतून पडले आहेत,"

"त्यांनी (नरेंद्र मोदी, अमित शाह) देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेकडे, कश्मीरमधील सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष घालणं गरजेचं आहे. दुर्दैवानं फक्त राजकारण, विरोधकांवर हल्ले, ईडी-सीबीआय सारख्या संस्थांचा दुरुपयोग याच्यात गुंतलेल्या सरकारला कश्मिरी पंडितांचा आक्रोश दिसत नाही. हे या देशाचं आणि देशातील हिंदूंचं दुर्दैव आहे," अशी टीका राऊत यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT