देश

ज्ञानवापी मशिद वादात मुख्तार अब्बास नक्वी यांची उडी; औरंगजेबाची क्रुरता...

सरकारनामा ब्युरो

Hindu-muslim Politics in India

नवी दिल्ली : "धर्मांध औरंगजेबाने केलेले गुन्हे लपवण्याचे कारण नाही, त्याने केलेल्या गुन्हेगारी कृत्यांचा आजही मुस्लिम समुदायाला त्रास होतो, हे विसरू नये. ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण करण्याचा न्यायालयाने दिलेला फैसला मुस्लिम पक्षाने स्वीकारला पाहिजे. सत्य पुढे येऊ दिले पाहिजे, अशी भूमिका केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी (Mukhtar abbas Nakvi) यांनी मांडली आहे.

काशीमधील ज्ञानवापी मशिदीच्या वाद शिगेला पोहचला असताना आता केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी या वादावरुन मुस्लिम समुदायाला सुनावले आहे. काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरच्या परिसरात असलेली ज्ञानवापी मशिदीच्या तीन भिंती हिंदू बांधणीच्या आहेत. वरती फक्त मशिदीसारखे घुमट बांधले आहेत. हे मूळ हिंदू मंदिर होते. नंतर त्याचे मशिदीत रूपांतर केल्याचा दावा करत हिंदू पक्षाने न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीचे व्हिडीओग्राफी सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले असून त्यासाठी स्वतंत्र वकील कमिशनर नेमून ही व्हिडिओग्राफी सुरू करण्यात आली.परंतु, मुस्लीम पक्षाने त्यावर आक्षेप घेतल्याने आता या मुद्द्यावरुन उत्तर प्रदेशात मोठा वाद उफाळला आहे. अनेक मुस्लीम नेत्यांनी यात उडी घेतली असून 1990 च्या दशकात अयोध्येत जी परिस्थिती निर्माण केली होती, तशीच परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप खासदार असदुद्दीन ओवैसी केला आहे.

तर ज्ञानवापी मशीद वादामध्ये न्यायालयाला निर्णय घेऊ द्या, न्यायालयाचे काय मत आहे? न्यायालय कोणता आदेश देते??, या बाबी बाजूला ठेवल्या तरी धर्मांध औरंगजेबाचे गुन्हे लपवण्याचे काहीच कारण नाही, असे प्रत्युत्तर मुख्तार अब्बास नकवी यांनी दिली आहे. मशिदीच्या भिंतीवर शृंगार गौरी, गणेश, मारूती, अशा देवीदेवतांच्या प्रतिमा आहेत. या संदर्भातले सर्वेक्षण तसेच मशिदीच्या तळघराचे सर्वेक्षण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र मुस्लिम समाजाने या सर्वेक्षणाला विरोध आहे. त्यामुळे नकवी यांनी सर्वेक्षण पूर्ण होऊन त्यातले सत्य बाहेर येऊ द्यावे, असे स्पष्टपणे केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT