Atishi Marlena sarkarnama
देश

Mahila Samman Yojana: महिलांच्या खात्यात 1 हजार रुपये जमा होण्यासाठी लागणार तीन महिने; कारण जाणून घ्या!

Delhi Govt News Mukhyamantri Mahila Samman Yojana: योजनेसाठी दरवर्षी 4 हजार 560 रुपयांचा निधी लागणार आहे. यासाठी 49 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी त्यांचे वेतन, कार्यालयीन खर्च सुमारे अडीच कोटी रुपये येणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी जमा होणार ही चर्चा महाराष्ट्रात सुरु असताना दिल्ली सरकारने मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेला मंजूरी दिली आहे. या योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात 1 हजार रुपयाचा पहिला हप्ता जमा होण्यासाठी तीन महिन्यापेक्षा अधिक कालावधी लागेल, असे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री महिला सन्मान योजने सुरु करण्यासाठी ऑनलाइन पोर्टल, त्याची चाचणी, अमलबजावणी करण्यासाठी तीन महिन्यापेक्षा अधिक कालावधी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या योजनेसाठी दिल्ली सरकार स्वतंत्र विभाग स्थापन करणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तर दुसरीकडे दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी सांगितले कि पीएमयूसाठी नवीन पद निर्माण करण्याची गरज नाही. यासाठी एखाद्या एजन्सीला हे काम दिले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

या प्रस्तावित योजनेत काही बदल करण्याचा विचार सरकार करत आहे. ज्या कुटुंबाचे वार्षिक उपन्न तीन लाखांपेक्षा कमी आहे, त्याच कुटुंबातील महिलांनाच या योजनेत सहभागी करा, अशी सूचना देण्यात आली आहे. राज्याचा महिला आणि बालकल्याण विभाग यावर काम करीत आहे. या विभागाच्या मंजुरीनंतर लाभार्थी महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल.

मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर ही योजना विधानसभा निवडणुकीपूर्वी लागू करण्यात यावी, अशी सूचना अधिकाऱ्यांनी केली आहे. या योजनेसाठी दरवर्षी 4 हजार 560 रुपयांचा निधी लागणार आहे. यासाठी 49 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी त्यांचे वेतन, कार्यालयीन खर्च सुमारे अडीच कोटी रुपये येणार आहे.

येत्या जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्या अगोदर ही योजना राज्यात लागू झाली तर त्यांचा फायदा सत्ताधाऱ्यांना होईल, असे राजकीय जाणकरांचे म्हणणे आहे. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीपूवी सरकारने अमलबजावणी केलेली लाडकी बहीण योजना फायदेशीर ठरली, तोच प्रयोग आता दिल्लीत सध्याचे सत्ताधारी करीत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT