mumbai local is on hit list of terrorists says sources
mumbai local is on hit list of terrorists says sources 
देश

मोठी बातमी : दहशतवाद्यांच्या 'रडार'वर लोकल

वृत्तसंस्था

मुंबई : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने सहा दहशतवाद्यांना (Terrorist) अटक केली आहे. या दहशतवाद्यांच्या चौकशीत त्यांनी मुंबईतील लोकलची (Mumbai Local) टेहळणी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईची लोकल दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याचे समजताच सुरक्षा यंत्रणा दक्ष झाल्या आहेत. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत आज रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाची उच्चस्तरीय बैठक झाली. 

देशात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने उघडकीस आणला आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी 6 दहशतवाद्यांना अटक केली. या कटात पकडलेला एक दहशतवादी हा मुंबईचा रहिवासी असून, त्याचे नाव जान मोहम्मद असे आहे. सणासुदीच्या काळात दहशतवाद्यांनी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्लीत हल्ला करण्याचा कट आखला होता. त्यांच्या रडारवर मुंबईची लोकल असल्याची माहिती चौकशीत एका दहशतवाद्याने दिली आहे.

जान मोहम्मद अली शेख हा धारावीतील रहिवासी आहे. तो पत्नी आणि दोन मुलींसह तेथे राहत होता. जान हा ड्रायव्हर आहे. त्याच्यावर लोकलसोबतच मुंबईतील इतर ठिकाणांची टेहळणी करण्याची जबाबदारी होती का, याचा तपास सुरू आहे. त्याचे कोणत्या दहशतवादी संघटनेशी संबंध आहेत का याचीही चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

मुंबईतील लोकलच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलासह रेल्वे पोलीस आणि इतर सुरक्षा विभाग दक्ष झाले आहेत. जागोजागी तपासणी करणे, श्वान पथक, बॉम्बशोधक पथकांद्वारे पाहणी करण्यात येत आहे. संशंयित हालचाली दिसल्यास स्थानकावरील हमाल, बूट पॉलिश करणाऱ्यांना माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे सूत्रांनी सांगितले. 

रेल्वे परिसरात महिलांवर अत्याचार होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे गस्तीचे प्रमाण वाढवण्यासोबत सीसी टीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवण्यावर चर्चा झाली आहे. महापालिका आणि रेल्वेच्या हद्दीच्या भागात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यासाठी भर दिला जाणार आहे, अशी  माहिती रेल्वे सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT