<div class="paragraphs"><p>Ranjit Srinivasan</p></div>

Ranjit Srinivasan

 

sarkarnama

देश

मोठी बातमी : भाजप ओबीसी मोर्चाच्या नेत्याची घरात घुसून हत्या

सरकारनामा ब्यूरो

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये बारा तासात दोन राजकीय नेत्यांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी केरळमधील सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे सचिव के.एस. शान यांच्यावर हल्ला झाला होता. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर रविवारी भाजपच्या ओबीसी मोर्चाचे सचिव रंजित श्रीनिवासन (Ranjit Srinivasan) यांची आज सकाळी त्यांच्या घरात घुसून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार केरळमध्ये घडला.

या घटनेमुळे येथे तणाव निर्माण झाला होता. सध्या परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन (Pinarayi Vijayan) यांनी या घटनेचा निषेध केला आहे. अलाप्पुझामध्ये ही घटना घडली

बारा तासापूर्वी केरळमधील सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे सचिव के.एस. शान यांच्यावर हल्ला झाला होता. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अलाप्पुझा जिल्ह्यात गेल्या बारा तासामध्ये दोन राजकीय नेत्यांची हत्या झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे.

अलाप्पुझा जिल्ह्यात दोन दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या दोन्ही नेत्यांच्या हत्याची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे.

के.एस. शान यांच्या मृत्यूनंतर सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे पक्षाध्यक्ष आणि एम.के. फैजी यांनी या प्रकरणामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचा आरोप केला आहे. शान हे दुचारीवरुन घरी जात असताना त्यांच्यावर अज्ञान कारने धडक दिली. त्यानंतर या कारमधील काही व्यक्तींनी त्यांची हत्या केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT