murli manohar joshi on vishwaguru statement : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी 'विश्वगुरु' या शब्दाच्या वापरावरून भाजपला घरचा आहेर दिला आहे. त्यांनी आज आपण विश्वगुरु नाही आहोत. यामुळे 'विश्वगुरु' हा शब्द वापरू नये, असे म्हटले आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून एकच खळबळ उडाली आहे.
जोशी यांच्या या विधानानंतर भाजपच्या आत्मपरीक्षणाची गरज असल्याचे संकेत काहींनी दिले आहेत. तर काहींनी संस्कृत आणि भारतीय ज्ञान परंपरेकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे म्हटलं आहे. ते संस्कृत भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी कार्यरत असलेल्या 'संस्कृत भारती' या संस्थेच्या दिल्लीतील केंद्रीय कार्यालयाचे उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी 'विश्वगुरु' या शब्दाच्या वापरावर महत्त्वाचे भाष्य करताना सध्या 'विश्वगुरु' हा शब्द वापरू नये, कारण सध्या आपण आज विश्वगुरु नाही आहोत. पूर्वी आपण तसे होतो, पण आज तसे म्हणणे योग्य नाही, असे म्हणत भाजपला घरचा आहेर दिला आहे.
यावेळी ते म्हणाले की, संस्कृत भारतीच्या कार्यालयाचे उद्घाटन होणे ही आनंदाची बाब आहे. मात्र खरे यश हे देशातील बहुतांश कामे संस्कृत भाषेत होतील तेव्हाच मिळेल. संस्कृत हीच भारताची खरी राष्ट्रभाषा असावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
याबाबत डॉ. आंबेडकरांच्या काळातही चर्चा झाली होती, पण ते होऊ शकले नाही. आजही संस्कृतमध्ये कामकाज होणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. तसेच नासाचे संशोधकही वारंवार सांगतात की संस्कृत ही संवादासाठीची महत्त्वाची भाषा असून जी केवळ भारताची नव्हे, तर संपूर्ण जगाचा वारसा आहे. जी ज्ञान, विज्ञान, अध्यात्म आणि तंत्रज्ञानाची भाषा आहे.
1. मुरली मनोहर जोशी यांनी काय वक्तव्य केले?
भारत सध्या ‘विश्वगुरु’ नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
2. त्यांनी हे वक्तव्य कुठे केले?
दिल्लीतील संस्कृत भारतीच्या कार्यक्रमात केले.
3. ‘विश्वगुरु’ शब्दाबद्दल त्यांचे मत काय आहे?
तो शब्द सध्या वापरू नये, असे त्यांनी म्हटले.
4. त्यांनी भारताबद्दल काय अपेक्षा व्यक्त केली?
भारताने भविष्यात ‘विश्वगुरु’ बनावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
5. या वक्तव्याचा काय परिणाम होऊ शकतो?
राजकीय आणि सामाजिक पातळीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.