Amit Shah  Sarkarnama
देश

Amit Shah : गृहमंत्री अमित शाहांचा मोठा निर्णय; काश्मीरमधील 'या' मुस्लीम संघटनेवर बंदी

Muslim League Jammu Kashmir : संघटनेचे सदस्य दहशतवादी कारवायांना पाठिंबा देतात...

Rajanand More

Jammu and Kashmir : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी फुटीरवादी संघटना तसेच दहशतवादावर मोठा प्रहार केला. दहशतवादी संघटनांना पाठिंबा देत असल्याचा ठपका ठेवत मुस्लीम लीग जम्मू काश्मीर (मसरत आलम गट) या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यांतर्गत (UAPA) ही बंदी घालण्यात आली आहे.

अमित शाह (Amit Shah) यांनी ‘एक्स’वरून बंदीची माहिती दिली आहे. शाह यांनी म्हटले आहे की, मुस्लीम लीग जम्मू काश्मीर (मसरत आलम गट) (MLJK-MA) या संघटनेला यूएपीए अंतर्गत बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित करण्यात आले आहे. ही संघटना आणि त्याचे सदस्य जम्मू आणि काश्मीरमध्ये देशविरोधी आणि फुटीरवादी कारवायांमध्ये सहभागी आहेत.

संघटनेचे सदस्य दहशतवादी कारवायांना पाठिंबा देतात आणि लोकांना जम्मू-काश्मीरमध्ये इस्लामी सत्ता स्थापन करण्यासाठी भडकावत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा संदेश स्पष्ट आहे की, देशाची एकता, सार्वभौमत्व आणि अखंडतेच्या विरोधात काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सोडले जाणार नाही. त्यांना कायद्याचा सामना करावा लागेल, असे शाह यांनी ठणकावून सांगितले.

Edited by Rajanand More

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT