N. Biren Singh  Sarkarnama
देश

अखेर सस्पेन्स संपला; दहा दिवसांनंतर भाजपकडून मुख्यमंत्रिपदावर शिक्कामोर्तब

मणिपूर विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवूनही सत्ताधारी भाजपला मुख्यमंत्रिपदाचे नाव जाहीर करता आले नव्हते.

सरकारनामा ब्युरो

इम्फाळ : मणिपूर (Manipur) विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) बहुमत मिळवूनही सत्ताधारी भाजपला (BJP) मुख्यमंत्रिपदाचे नाव जाहीर करता आले नव्हते. दहा दिवस चाललेल्या चर्चेनंतर अखेर रविवारी हे नाव निश्चित करण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री एन. बिरेनसिंह (N. Biren Singh) यांच्याच नेतृत्वावर भाजपनं विश्वास दाखवला आहे. त्यामुळे पुढील पाच वर्ष मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेनसिंह राहणार आहेत. (Manipur Assembly Election)

भाजपला विधानसभा निवडणुकीत 60 पैकी 32 जागा मिळाल्या आहेत. भाजपने बहुमताच्या आकडा गाठला असला तरी मुख्यमंत्रिपदाचा पेच निर्माण झाला होता. दिल्लीत झालेल्या मॅरेथॉन बैठकांनंतर बिरेनसिंह यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकण्यात आली. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण आणि किरण रिजिजू यांना भाजपने रविवारी केंदीय निरीक्षक म्हणून राज्यात पाठवले होते. त्यांनीच बिरेनसिंह यांच्या नावाची घोषणा केली.

दरम्यान, बिरेनसिंह यांच्यासह ज्येष्ठ नेते थोंगाम विश्वजितसिंह आणि युमनाम केमचंद यांच्या नावाचीही चर्चा होती. त्यांना या आठवड्यात दुसऱ्यांदा दिल्लीला पाचारण करण्यात आले होते. आज सकाळीच हे नेते पून्हा राज्यात परतले. त्यानंतर आमदारांची बैठक घेत बिरेनसिंह यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. भाजपने उत्तर प्रदेश वगळता कोणत्याही राज्यात मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवला नव्हता. त्यामुळे निकालानंतर दहा दिवस उलटून गेले तरी अजूनही तीन दोन राज्यांमध्ये घोळ सुरूच आहे.

दरम्यान, भाजपने कोणत्याही पक्षाशी आघाडी न करता एकला चलोची भूमिका या वेळी घेतली होती. याचवेळी विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने सहा पक्षांशी आघाडी केली होती. काँग्रेसप्रणित मणिपूर प्रोगेसिव्ह सेक्युलर अलायन्स या आघाडीने भाजपला जोरदार टक्कर दिली आहे. भाजपने राज्यात 32 जागा मिळवल्या आहेत. काँग्रेसने 5 तर काँग्रेसचे सहकारी पक्ष नॅशनल पीपल्स पार्टी 7, संयुक्त जनता दल 6 आणि नागा पीपल्स फ्रंट 5 जागांवर विजयी झाले आहेत. यातील नागा पीपल्स फ्रंट आणि संयुक्त जनता दल आता भाजपसोबत जाणार आहेत. त्यामुळे नॅशनल पीपल्स पार्टी आणि काँग्रेस हे दोनच विरोधी पक्ष उरले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT