Nagaland Assembly Election 2023 kazheto kinimi
Nagaland Assembly Election 2023 kazheto kinimi sarkarnama
देश

BJP News : मोठी बातमी : निवडणुकीपूर्वीच 'या' मतदारसंघात भाजपनं उघडले खाते..

सरकारनामा ब्युरो

Nagaland Assembly Election 2023 News Update : नागालँड मध्ये 27 फेब्रुवारीला विधानसभा निवडणुकीसाठी (Nagaland Assembly Election 2023) मतदान होत आहे.

मतदानापूर्वी भाजपने (BJP) आपले खाते उघडले आहे. काँग्रेसच्या उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतल्याने भाजप उमेदवाराची बिनविरोध निवड झाली आहे.

काँग्रेस उमेदवार खेकाशे सुमी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अकुलुतो विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार कझेतो किनिमी यांची बिनविरोध निवड झाली आहे.

नागालँडचे मुख्य निवडणूक अधिकारी व्ही शशांक शेखर यांनी ही माहिती दिली. बीजेपी नागालैंड यांनी आपल्या ऑफिशियल ट्विटर अकाउंटवरुनही ही माहिती दिली आहे. कझेतो किनिमी हे सध्या तेथील विद्यमान आमदार आहेत.

मोदींवरील जनतेच्या विश्वासाचा विजय

आपल्या बिनविरोध निवडीबाबत कझेतो किनिमी म्हणाले, "मला जुनहेबोतो जिल्ह्यातील अकुलुतो विधानसभेतील मतदारांना दुसऱ्यांदा काम करण्याची संधी दिली आहे. त्यांचा मी आभारी आहे. माझे समर्थक, हितचिंतक आणि नागालँड राज्य भाजप कार्यकर्त्यांचा मी आभारी आहे. हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरील जनतेच्या विश्वासाचा विजय आहे.

४०:२० असा फॉर्मुला

नागालँड येथे २७ तारखेला ६० जागांसाठी मतदान होत आहे, पण आता कझेतो यांच्या बिनविरोध निवडीमुळे ५९ जागांवर मतदान होणार आहे.

एनडीपीपी (ANDPP)सोबत या ठिकाणी निवडणुक रिंगणात आहे. २०१८ मध्ये दोघांनी एकत्र निवडणूक लढवली होती. गेल्या वेळेप्रमाणेच या निवडणुकीतही ४०:२० असा फॉर्मुला आहे.

पुढील आठवड्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे मेघालय आणि नागालँड मध्ये दौरा करणार आहेत. २०१८च्या विधानसभा निवडणुकीत नागा पीपल्स फ्रंट (एनपीएफ)ला २६, नॅशनलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव पार्टी (एनडीडीपी)ला १६,भाजपला १२, एनपीपी २, जेडीयूला १ जागा मिळाली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT