Nagar Singh Chouhan Sarkarnama
देश

BJP Politics : काँग्रेसमधून आलेल्या आमदारावरून भाजपमध्ये घमासान; मंत्री राजीनामा देण्याच्या तयारीत

Nagarsingh Chouhan Ramniwas Rawat Madhya Pradesh Government : रामनिवास रावत हे काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमधून भाजपमध्ये आले आहेत. त्यांनी नुकतीच मंत्रिपदाची शपथ घेतली होती.

Rajanand More

Bhopal : काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये आलेल्या आमदारावरून घमासान सुरू झाले आहे. या आमदारांनी नुकतीच मंत्रिपदाची शपथ घेतली होती. ज्येष्ठ मंत्र्यांकडील खाते काढून त्यांच्याकडे देण्यात आल्याने विद्यमान मंत्री चांगलेच भडकले आहे. त्यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. तसेच खासदार असलेली पत्नी राजीनामा देईल, अस ठणकावून सांगितले आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री नागरसिंह चौहान यांनी हा इशारा दिला आहे. मध्य प्रदेशात भाजपची सत्ता असून चौहान हे जवळपास 25 वर्षांपासून भाजपमध्ये सक्रीय आहेत. त्यांनी राजीनाम्याचा इशारा दिल्याने भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे समोर आले आहे.

नेमकं काय घडलं?

काँग्रेसचे आमदार रामनिवास रावत यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचा नुकताच मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. रविवारी त्यांच्याकडे वन व पर्यावरण विभागाचा कारभार सोपवण्यात आला. तोपर्यंत हा विभाग नागरसिंह चौहान यांच्याकडे होता. त्यामुळे चौहान प्रचंड नाराज झाले आहेत. त्यांच्याकडे आता अनुसूचित जाती कल्याण हा विभाग राहिला आहे.

चौहान हे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे विश्वासू मानले जातात. मंत्रिपद काढून घेतल्यानंतर त्यांनी थेट निशाणा साधला आहे. हा केवळ माझ्यावर नाही तर राज्यातील आदिवासी समाजावर अन्याय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. निर्णय मागे घेतला नाही तर आपण राजीनामा देऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे. एवढेच नाही तर रतलामच्या खासदार असलेल्या त्यांच्या पत्नी अनिताही पदाचा राजीनामा देतील, असेही त्यांनी म्हटले आहे.

मी 25 वर्षांपासून भाजपमध्ये काम करत आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांचे ऐकून घेतले जात नाही, हे आजपर्यंत होत नव्हते. मी पक्षावर नाराज आहे. एवढा मोठा निर्णय घेताना मला ना संघटनेने विचारे ना सरकारने. मी पक्षापुढे बाजू मांडेन. त्याबाबत निर्णय घेतला नाही तर एक-दोन दिवसांत माझ्यासह पत्नीही राजीनामा देईल.

चौहान यांचा आदिवासी समाजामध्ये मोठे काम आहे. त्याचा फायदा भाजपला लोकसभा निवडणुकीतही झाला आहे. ते सध्या पक्षाचे प्रदेश उपाध्यक्षही आहेत. त्यामुळे त्यांनी मंत्रिपदाचा आणि पत्नीने खासदारकीचा राजीनामा दिल्यास आदिवासी समाजात वेगळा संदेश जाऊ शकतो, त्याचा फटका भाजपला पुढील काळत बसू शकतो, अशी चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT